!! पाऊले चालती पंढरीची वाट !! (१६ )
आज पालखीचे प्रस्थान दीड वाजता असल्याने आम्ही उशिरा उठलो. माझी प्रकृती बरी नसल्याने Bhandiशेगावमधील स्थानिक वैद्याकडे गेलो.त्यांच्याकडे उपचार घेतला. माझ्या प्रकृतीत फारसी सुधारणा झाली नाही. तरी मी चालण्याचा निर्णय घेतला. अंतर कमी असल्याने सहज चालु असे वाटले. प्रत्यक्षात तसे घडले नाही. मला माझ्या सहकाऱ्यांनी वैष्णव मेडिकलच्या कॅम्पमध्ये आणले .लगेचच उपचार केले .आणि त्यांच्या वाहनातून मुक्कामाचे ठिकाणी पोहचवले. आज वारीचा फार आनंद लुटता आला नाही. आजचा टप्पा लहान असल्याने चाललो.सकाळच्या वेळी मी विश्रांती घेतली होती म्हणूनच मला हे शक्य झाले.
पालखीचे प्रस्थान निर्धारीत वेळेत झाले. आज या मार्गावर पावसाच्या सरी येत होत्या. वारकरी ,भाविक, भक्त पावसाचा आनंद लुटत होते.ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत होते. बाजीरावाच्या विहिरीच्या अलीकडे उभे रिंगण झाले.ते खुप जवळून पाहता आले.तेथुन अगदी जवळ असणाऱ्या गोल रिंगणाचा वारकऱ्यांनी आनंद लुटला.
वारीचे प्रस्थान होताना गावाजवळ अनेक जिल्ह्यातील चित्ररथ उभे होते .त्यांनी आपआपले विषय जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. वारी नारी शक्तीची या चित्ररथाने माझे लक्ष वेधून घेतले.महिला बचत गटांच्याद्वारे महिला आर्थिक सक्षमीकरण, शालेय महाविद्यालयातील युवतीसाठी निर्भया पथक, पती पत्नी समुपदेशन, अध्यात्मिक चिंतनाद्वारे महिलांना मार्गदर्शन या सर्व बाबी पोलीस पथकाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला.
महिला सक्षमीकरनासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत .आवश्यकतेप्रमाणे त्याचा लाभ गरजू महिलांनी घ्यावा हाच संदेश चित्ररथाचे माध्यमातून मिळतो असे मला वाटते.
शब्दांकन --राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा