सोमवार, १ जुलै, २०१९

!!पाऊले चालती पंढरीची वाट !! (७ )


         आज सकाळी लवकर उठून तयार झालो. पालखीचे प्रस्थान सकाळी ६ वाजताच होणार असल्याने ५.३० लाच निवासस्थान सोडले आणि पालखी तळाकडे मार्गस्थ झालो.बरोबर ६ वाजता पालखीचे प्रस्थान झाले.सुरुवातीला चारपाच किलोमीटर पावसाची उघडीप होती.जेजुरी वाल्हे मार्गावर घाटाच्या सुरवातीला पहिला विसावा होता. नंतर मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. आजचा प्रवासाचा टप्पा फक्त१२ कि. मी. चाच होता.दौंडज याठिकाणी विसावा घेतल्यानंतर आम्ही ११.३० च्या दरम्यान वाल्हे याठिकाणी पोहोचलो. वाल्हे येथे आमच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था दिपक खवले यांनी केली होती तर आजची निवास व भोजन व्यवस्था  हरणी येथील चंद्रकांत यादव यांनी केली होती. दुपारी वाल्हेजवळ असणाऱ्या वीर येथील श्रीनाथ म्हसकोबा या तीर्थक्षेत्राला भेट दिली.वाल्हे येथे वाल्मिकी ऋषींचे मंदीर आहे. वाल्मिकीना नारदमुनीनी सन्मार्गाला लावले. आपल्या पापाचे वाटेकरी आपणच आहोत. खरेतर सगळेजण साधल्याचे सोबती असतात. वाल्याचा वाल्मिकी हा केवळ श्रीरामाच्या नामाने झालेला आहे.
     यासंबंधी एक भजन आहे त्याचे ध्रुवपद आपल्या माहितीसाठी -
   "श्रीराम बोला,श्रीराम बोला,श्रीराम बोला,किती मंत्र हा सोपा!
   महापातकी वाल्या कोळी,उलट्या नामे पापे जाळी, वाजविला डंका, वाजविला डंका, वाजविला डंका, किती मंत्र हा सोपा!"
      थोडक्यात काय वाल्याला राम पण म्हणता येत नव्हते. मरा मरा म्हणून उच्चारायला सुरुवात केली. आपोआपच राम नाम उच्चारले गेले, आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. संतसंगाने माणसात परिवर्तन घडून येते आपल्या जीवनाचा उध्दार व्हावयाचा असेल तर सत्संगच महत्वाचा असतो असे मला वाटते.
     शब्दांकन -- राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...