!! गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने !!
!! बॅरिस्टर गांधी !!
गांधीजींनी १८ व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा पास केली.त्यानंतर लगेचच ते कायद्याचं शिक्षण घ्यायला लंडनला गेले.कायद्याची परीक्षा देणे सोपे असल्याचे त्यांच्या लगेचच लक्षात आले. बॅरिस्टरना त्याकाळी ' डिनर बॅरिस्टर'म्हणत ,कारण त्यांना मेजवान्याना उपस्थित राहावे लागत असे, त्याचा खर्च विद्यार्थ्यांना करावा लागत असे. गांधीजींना ते आवडत नसे.ते शाकाहारी होते आणि मद्य घेत नसत.
खटला चालवत असताना पुस्तकी ज्ञान कसे वापरावे ते त्यांना कळेना. एका इंग्रजी वकिलाने त्यांना सांगितले की,"प्रामाणिकपणा आणि मेहनत या गोष्टी चांगला वकील होण्यासाठी पुरेश्या आहेत.याच गुणांवर पुरेसे पैसे मिळवता येतात" यामुळे गांधीजींना हुरुप आला.गांधीजींनी इतिहास व सामान्य ज्ञानाची पुस्तके वाचण्याचा इंग्रजी सद्गृहस्थाचा सल्ला मानला.
गांधीजींनी थोडा वेळ स्मार्ट 'इंग्रजी सदग्रहस्थ' बनण्याचा प्रयत्न केला. त्यांनी योग्यप्रकारे उच्चार करणं, भाषण करणं, नृत्य करण,व्हायोलिन वाजवणे आणि सुटबुट घालण्याचा सराव केला.त्यांचे जीवन आरामाकडे आणि चैनीकडे झुकू लागलं.आपण वेडेपणा करत असल्याचे काही महिन्यात त्यांच्या लक्षात आले. या महागड्या सवयीमुळे ते आपल्या मोठया भावावर पैशाचे ओझं टाकत होते. ते इंग्लडला कायदा शिकायला आले होते, ब्रिटिश माणसासारखी राहणी शिकायला नाही. ताबडतोब त्यांनी आपली राहणी बदलली.इंग्लंडमध्ये ३२ महिने राहिल्यावर, ते योग्यवेळी बॅरिस्टर झाले. आणि ते भारतात परतले.
गांधीजींचा पहिला खटला अगदी साधा होता. त्यांना ३० रुपये फी मिळणार होती.२२ वर्षाचा अननुभवी बॅरिस्टर बोलायला उभा राहिला पण त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना लाजिरवान्या अवस्थेत त्यांना कोर्टातून निघून जावे लागले. पुन्हा त्या कोर्टात त्यांनी खटला चालवला नाही.
सुरुवातीला गांधीजींना खर्चाचा मेळ बसला नाही.६ महिने अनुभव घेतल्यानंतर गांधीजी राजकोटला घरी परत गेले.इंग्लंडहुन आलेला आपला भाऊ यशस्वीपणे व्यवसाय करील याबाबत घरातील लोकांची घोर निराशा झाली. गांधीजींना फार वाईट वाटलं.सुरुवातीस गांधीजींना आर्थिक चणचण खूपच भासली.
गांधीजींच्या सुदैवानं त्यांच्याकडे दक्षिण आफ्रिकेतल्या एका श्रीमंत मुसलमान व्यापाऱ्यांचे काम चालुन आले. त्यांना या कामाचा चांगला मोबदला मिळणार होता. त्यांनी हे काम स्वीकारले .डर्बनला पोचल्यावर तिसऱ्या दिवशी गांधीजी कोर्टात गेले.तिथल्या न्यायमूर्तींनी त्यांना पगडी काढायला सांगितली त्यास गांधीजींनी नकार दिला आणि ते बाहेर पडले. दक्षिण आफ्रिकेत पाऊल टाकल्यापासून ते पाहत होते गोरे लोक भारतीयांना वाईट वागणूक देत होते त्यांचे तिथे स्वागत होत नव्हत.आणि त्यांच्यावर' हमाल बॅरिस्टर'असा शिक्का पडला. या अपमानांनी ते अस्वस्थ झाले. त्यानंतर गांधीजींनी दादा अब्दुल्लाच्या खटल्यात समेट घडवुन आणला.
गांधीजींनी डर्बनच्या न्यायालयात वकिली सुरु केली. तेव्हा बालसुंदरम नावाचा कामगार तिथे आला.त्याचे कपडे फाटले होते आणि पुढचे दोन दात पडले होते. त्याला गोऱ्या मालकांनी मारले होते. गांधीजींनी त्याला शांत केलं .त्याला गोऱ्या डॉक्टरकडे उपचारासाठी नेलं आणि त्याची दुखापत गंभीरअसल्यामुळे तसं प्रमाणपत्र मिळवलं.बालसुंदरमचा खटला त्यांनी लढवला आणि जिंकला. त्यानंतर त्याला चांगला मालक मिळवुन दिला.या घटनेमुळे गरीब भारतीय कामगारांमध्ये ते एकदम लोकप्रिय झाले. दिनदुबळ्यांचा रक्षणकर्ता म्हणून त्यांची कीर्ती भारतापर्यंत पोचली. त्यानंतर लोक त्यांचाकडे निराधार लोकांचा मित्र म्हणून पाहू लागले.
भारतात आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांना असे आढळून आले की १०० खटल्यापैकी ९९ खटल्यात भारतीयांना युरोपियनाविरुद्ध न्याय मिळत नसे.त्यामुळे त्यांनी म्हटलं,"एखाद्यातरी इंग्रजाला भारतातल्या निर्घृण हत्याबद्धल कडक शिक्षा झाली आहे का?इंग्रज अधिकाऱ्याच्या खटल्याकडे आणि त्यांना झालेल्या किरकोळ शिक्षेकडे पहा. त्यांनी जाणूनबुजून केलेल्या असाह्य निग्रोच्या छळाबद्धल ही विनोदी शिक्षा--"स्वतःचेच कडक नियम पाळून आणि कायद्याविरूद्ध अनेकदा ताशेरे झाडूनही गांधीजींचा व्यवसाय वाढत गेला. भारतात त्यांनी फार कमी काळ वकिली केली.दक्षिण आफ्रिकेत त्यांनी २० वर्षाचेवर वकिली केली.
आपल्या देशातील लोकांना मानवी अधिकार मिळावेत यासाठी सरकारला विरोध करायला गांधीजी शिकवत.त्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले आणि दक्षिण आफ्रिकेच्या तसेच भारतीय न्यायालयातही खटले चालविण्यात आले होते. अनेकदा ते तुरुंगात गेले.दक्षिण आफ्रिकेत ज्या कोर्टात वकिली केली त्याच कोर्टात त्यांना बेड्या घातलेल्या अवस्थेत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं. त्यांना अशा प्रकारे पहिली शिक्षा झाल्यावर त्यांचे नाव बॅरिस्टर यादीतून वगळण्यात आले.
गांधीजींनी ब्रिटिश न्यायालयाविरुद्ध असहकार पुकारला. गांधीजींनी हाक दिल्यावर अनेक प्रथितयश वकिलांनी आपली वकिली सोडली आणि स्वातंत्र्य चळवळीत ते सामील झाले.
संदर्भ-- बहुरूप गांधी
लेखक -- अनु बंदोपाध्याय
संग्राहक -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा