शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५

!!लंडन स्टॉक एक्सचेंज आशियायी राष्ट्राचे प्रमुख आर्थिक सल्लागार रणजित मानसिंग पवार शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबईच्यावतीने सन्मानित !!

 !! शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबईच्यावतीने रणजित पवार सन्मानित !!

    लंडन स्टॉक एक्सचेंज आशियायी राष्ट्राचे प्रमुख आर्थिक सल्लागार असणारे  रणजित मानसिंग पवार यांनी शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी शिवकृपा सहकारी पतपेढीच्या  रबाळे नवी मुंबई येथील मुख्यालयास  सदिच्छा भेट दिली. भेटीप्रसंगी  आपल्या देशाचे आयात निर्यात धोरण, अमेरिकन सरकारने लावलेले निर्बंध त्याचा जागतिक पातळीवर होणारा परिणाम याविषयी चर्चा झाली. भारत याही परिस्थितीतून निश्चित बाहेर पडेल असे त्यांनी सांगितले. सहकारी संस्थांचे देशाच्या अर्थकारणातील  महत्व अधोरेखित केले.

      रणजित यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख चव्हाण यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ,भगवद्गीता, संस्थेचा अहवाल देऊन केला. रणजित यांचा परिचय मी करुन दिला. याप्रसंगी उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी,संचालक शिरीष देशमुख, नरहर देव, बाळासाहेब मोहिते, हिंदुराव कदम, सुरेश संकपाळ, विजय घोरपडे,किशोर माने, ओंकार भोसले, रमेश चव्हाण, महिला संचालिका पूनम जगदाळे, स्मिता खराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश शेटे, कर्मचारी प्रतिनिधी लक्ष्मण फडतरे, सतीश कर्णे,महाव्यवस्थापक सुदाम  जाधव आदी उपस्थित होते.

          रणजित पवार यांनी संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि मदत करण्याचे आश्वासित  केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!लंडन स्टॉक एक्सचेंज आशियायी राष्ट्राचे प्रमुख आर्थिक सल्लागार रणजित मानसिंग पवार शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबईच्यावतीने सन्मानित !!

 !! शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबईच्यावतीने रणजित पवार सन्मानित !!     लंडन स्टॉक एक्सचेंज आशियायी राष्ट्राचे प्रमुख आर्थिक सल्लागार अ...