शिवकृपा सहकारी पतपेढी "दीपस्तंभ" पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने ज्या पतसंस्थांची उलाढाल १००० कोटीपेक्षा अधिक आहे अशा गटातून महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कॉसमॉस सहकारी बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत रामोजी फिल्म सिटी हैद्राबाद येथे शिवकृपाला देण्यात आला. पुरस्काराचा स्वीकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख चव्हाण,संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी, संचालक शिरीष देशमुख, नरहर देव, बाळासाहेब मोहिते, राजेंद्र पवार, हिंदुराव कदम, सुरेश संकपाळ,विजय घोरपडे, संतोष चव्हाण, किशोर माने, ओमकार भोसले, रमेश चव्हाण, शुभांगी वंजारी, पूनम जगदाळे यांनी केला. पुरस्कार वितरण समारंभा वेळी निवेदक संस्थेची सद्याची वाटचाल, संस्थेतील आदर्श बाबींचा उल्लेख करत होते. पुरस्कार प्राप्त संस्थांना बाहुबलीचा वेश परिधान केलेले युवक व्यासपिठाकडे घेऊन जात होते. वाद्यांचा तालसुर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होता. पुरस्कार प्राप्त संस्थांमध्ये शिवकृपा ही सगळ्यात मोठी संस्था होती. दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याने शिवकृपाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शिवकृपा सहकारी पतपेढी विषयी थोडंसं....
शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबईची स्थापना १९८२ ला विक्रोळी येथील शिवमंदिरात झाल्याने नाव शिवकृपा. संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे संस्था उभारणीत मोलाचे योगदान आहे. गत वर्षापासून चव्हाणसाहेब व वंजारीसाहेब यांनी पुन्हा पदभार स्वीकारून नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. वर्षभरात संस्थेने गरुडभरारी घेतली. सध्या संस्थेचा समिंश्र व्यवसाय ४७०० कोटीवर पोहोचला आहे. थोड्याच दिवसात ५००० कोटीचा टप्पा संस्था पार करेल यात संदेह नाही.
आपण कोणत्याही संस्थेत झोकून देऊन काम केले तर सन्मानास पात्र ठरतो. आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात करावे व सर्वोच्च पदाला जावे असे मनोमन वाटते.
राजेंद्र पवार
संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई
८१६९४३१३०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा