गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

!!माधुरी काळंगे यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता (Public Procurator) पदी निवड झालेबद्दल सत्कार !!

 !!माधुरी काळंगे यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता (Public Procurator) पदी निवड झालेबद्दल सत्कार !!

            वर्णे येथील अमर नामदेव काळंगे हे सध्या कुर्ला विनोबा भावेनगर या पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आहेत.ते आपल्या गावातील हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन  त्यांनी उच्च पदाला गवसणी घातली आहे.ते स्वतः एम. एस. सी.(अग्री ), एल. एल. बी. आहेत.

         अमर काळंगे यांच्या सौभाग्यवती एल. एल. एम. आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर कायदा क्षेत्रातील उच्च पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ५ वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली आहे. नुकतीच त्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी अभियोक्ता पद पटकावले आहे. महिला आपला प्रपंच सांभाळून शिक्षण घेऊ शकतात, व्यवसाय करु शकतात. इतकेच नव्हे तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एखादी पोस्ट प्राप्त करू शकतात. हे सर्वांनाच प्रेरणादायी आहे.

      अमर काळंगे, माधुरी काळंगे अशा जोड्या तयार झाल्या तर समाज, मी तर म्हणेन देश प्रगती पथावर जाण्यास वेळ लागणार नाही. या उच्च विद्याविभूषित जोडीचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. यांचा सत्कार करताना माझ्यासमवेत वर्णे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजयकुमार बाईंग, वर्णे ग्रामविकास मंडळ, मुंबईचे सरचिटणीस राजकुमार काळंगे, दत्तात्रय काळंगे उपस्थित होते.

     आपण जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या जोरावर यशाचा गवसणी घालू शकतो. हा आदर्श या जोडीने दिला आहे. या दांपत्याला मनापासून धन्यवाद, त्यांचे हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

      राजेंद्र पवार

    ९८५०७८११७८

    ८१६९४३१३०६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...