गुरुवार, २० जुलै, २०२३

संचालक मंडळ प्रशिक्षण कार्यक्रम शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई

 संचालक मंडळ प्रशिक्षण कार्यक्रम शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई

                महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली आदर्श व अग्रगण्य पतपेढीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे प्रशिक्षण शिबिर संस्थेच्या प्रशासकीय कार्यालय, रबाळे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी सहकार क्षेत्रात तज्ञ असलेले मा.श्री गणेश निमकर साहेब हे उपस्थित होते. त्यांचे स्वागत मा. पदाधिकारी, संचालक यांनी केले. तद्नंतर प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यांनी सर्व अभ्यासू संचालकांनी विचारलेले प्रश्न, शंका, यांचे निरसन करून समाधान केले. यामध्ये सहकार कायद्यातील नियम व उपविधीतील तरतुदी ,संचालक मंडळ अधिकार कर्तव्य व जबाबदाऱ्या तसेच लेखापरीक्षण वर्गवारी या विषयावरती मार्गदर्शन केले. सर्व संचालक यांनी समाधान व्यक्त केले.






         प्रशिक्षण कार्यक्रम अंतिम प्रसंगी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. गोरख चव्हाण साहेब व संस्थापक व उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत वंजारी साहेब यांनी  प्रशिक्षणाचे आपल्या जीवनातील महत्व विषद करुन ऋण व्यक्त केले.

           कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. संघशक्तीमुळे आपणास सहज उद्दीष्ट गाठता येते. मा. निमकर साहेबांच्या मार्गदर्शनामुळे शिवकृपा सहकार क्षेत्रात नवा मापदंड निर्माण करेल यात संदेह नाही.

राजेंद्र पवार 

मोबा ९८५०७८११७८ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...