!! Punit Balan Group Apla Pune Marathon Season - 3 !! (२३ जुलै )
आज पुनित बालन ग्रुपने आपलं पुणे मॅरेथॉनचे आयोजन केले होते.या मॅरेथॉनमधे ५, १०, २१, ३५, ४२, ५० किलोमीटर अशाप्रकारे भाग घेण्याची संधी होती. मी हाफ मॅरेथॉन २१ किलोमीटरमध्ये भाग घेतला होता.
आज मी ही स्पर्धा ०१:५६:४४ ( एक तास छपन्न मिनिटे आणि चव्वेचाळीस सेकंदात) पूर्ण केली. या स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथून सुरु झाल्या होत्या.
बरोबर ६ वाजता राज्यातील ज्येष्ठ पोलिस अधिकारी, आयर्नमॅन कृष्णप्रकाश व अन्य मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करुन स्पर्धेस प्रारंभ झाला. प्रारंभापूर्वी राष्ट्रगीताची धून पोलीस वाद्यवृंदाने वाजवली. स्पर्धा मार्गावर रुट सपोर्ट छान होता. जागोजागी वाद्यवृंद स्पर्धकांना प्रोत्साहन देत होते. इनर्जी फूड, पाण्याची व्यवस्था ठराविक अंतराने होती. माझ्याबरोबर विशाल घोरपडे, विनय चव्हाण, स्नेहल चव्हाण, उन्मेष जगदाळे, शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबईच्या संचालिका पुनम जगदाळे, माझे बंधू डॉ. दत्ता भोसले यांच्यासह सी. एफ. सी. क्लब चिंचवडचे अनेक धावपटू सहभागी झाले होते.
स्पर्धा चालू असताना पाऊस यावा असे वाटत होते पण तसे घडले नाही बऱ्याचवेळा आम्हाला अंगावर पाणी ओतून घ्यावे लागत होते. सध्या माझा सरावही कमी होता त्याचा परिणाम मला आज जाणवला. तरीही विशाल घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण करता आली याचा विशेष आनंद होत आहे.
सुदृढ आरोग्यासाठी, ताणतणावापासून मुक्ती मिळण्यासाठी व्यायामाची गरज आहे. तरी आपण सर्वांनीच व्यायामाची कास धरावी, स्पर्धेत भाग घ्यावा असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८