!! बजाज अलाइंझ पुणे हाफ मॅरेथॉन !! (BAPHM) (२७ नोव्हेंबर )
बजाज अलाइंझ जनरल इन्शुरन्स व लाईफ इन्शुरन्स यांच्या मार्फत पुणे येथे मॅरेथॉनचे आयोजन केले होते. येथील स्पर्धा २१ कि. मी.,१० कि. मी.,५ कि. मी. अशा होत्या .मी हाफ मॅरेथॉन (२१ कि. मी.) मध्ये भाग घेतला होता.
आज मी २१ कि. मी. हे अंतर १:५५:५६( एक तास, पंचावन्न मिनिटे व छप्पन सेकंदात )पूर्ण केले आणि ६१ ते ७० च्या वयोगटात माझा ७ वा क्रमांक आला. स्पर्धेचा प्रारंभ होण्यापूर्वी "जण गण मन" हे राष्ट्रगीत म्हटले गेले व नंतर लगेचच पहाटे ५:१५ वाजता बजाज अलाइंझचे सीईओ तपन सिंघल यांच्या शुभहस्ते झेंडा उंचावून स्पर्धेचा प्रारंभ बालेवाडी येथून झाला. स्पर्धेचा रुट खूपच छान होता. मार्गावर ठिकठिकाणी इनर्जी फूडची व्यवस्था केली होती. स्पर्धकात जोश निर्माण व्हावा यासाठी मार्गावर जागोजागी वाद्यांचा गजर होत होता.
बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शिवरायांचा भव्य पुतळा आहे. तो सर्वांनाच प्रेरणा देत आहे आणि देत राहील या पुतळ्याजवळून जाताना प्रत्येकजण अंगात संचारल्यासारखा धावत होता. आज माझ्याबरोबर साताराहून शेखर देशमुख व भोरचे जलतरणपटू सूर्यकांत भांडे पाटील सहभागी झाले होते. स्पर्धेची थीम "फिट इंडिया" अशी होती. आपल्या देशातील नागरिकांचे आरोग्य चांगले असेल तरच आपण प्रगती करु शकतो. तंदुरुस्त भारतासाठी सर्वजणच व्यायामाची कास धरूया. आपल्या देश अधिक सशक्त बनवूया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
अभिनंदन सर
उत्तर द्याहटवा