आई वडिलांचे चांगले संस्कारच सक्षम पिढया घडवतील: अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज
पालकांनी मुलांच्यावर जाणीवपूर्वक संस्कार केले तर आपोआपच मुलेही संस्कारक्षम घडतात, संस्कारक्षम समाज देशाला प्रगतीपथावर नेत असतो. कुटुंब, समाज संपूर्ण राष्ट्रच विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी जाणीवपूर्वक संस्कार करावेत असे आवाहन वर्णे येथे श्रीमती तारुबाई ज्ञानू सपकाळ यांच्या शताब्दी सोहळाप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिध्देश्वर महाराज यांनी काढले.
आज वृद्धाश्रम वाढताना दिसत आहेत. वृद्धाश्रमात भौतिक सुविधा मिळतील पण भावनिक प्रेम मिळत नाही. आई वडील भावनिक प्रेमाचे भुकेले असतात यासाठीच आपण सर्वांनीच आपल्या आई वडिलांची सेवा करावी असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी आमदार महेश शिंदे व प्रा. श्रीधर साळुंखे यांची कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे झाली. याप्रसंगी विरपत्नी श्रीमती जयश्री काळंगे, श्रीमती मयुराताई चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुभेदार नवनाथ सपकाळ यांच्या युनिटमध्ये अनेक माजी सैनिक उपस्थित होते त्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामचंद्र सपकाळ, नवनाथ सपकाळ, गोरख सपकाळ, रमेश सपकाळ, माजी सरपंच धैर्यशील पवार, शशिकांत पवार यांनी परिश्रम घेतले.
आपणा सर्वांना मातापित्यांची शताब्दी साजरी करण्याचा योग येवो, आपलं आरोग्य निरामय राहावे हीच शुभ कामना.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा