!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस पहिला २१ जून )
आज ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचा प्रस्थानाचा दिवस. संध्याकाळी ४ वाजता विधीवत पूजा होऊन पालखीचे प्रस्थान होते. प्रस्थान होताना मंदिराचा कळस हलतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्वत्र माऊली माऊली असा गजर ऐकायला मिळत होता. प्रत्येक दिंडी माऊलीच्या मंदिरात जाते. तेथून मार्गक्रमण करत, हरिनामाचा जयघोष करत दिंड्या पुढे पुढे जात होत्या. पालखी मार्गावर सर्वत्र फुगड्या खेळताना, भजन करताना वारकरी दिसत होते. इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर भाविकांची खचाखच गर्दी जाणवत होती.
आज संध्याकाळी पालखी आजोळघरी (गांधीवाडा ) येथे मुक्कामास असते. मार्गावर सर्वत्र रांगोळ्या काढलेल्या दिसत होत्या.कोरोनामुळे दोन वर्षे पालखी सोहळा न झाल्याने सर्वत्र प्रचंड गर्दी दिसत होती. भविकांच्यात प्रचंड उत्साह जाणवत होता. भक्ती मार्गाची ताकद खूप मोठी असते. पालखी सोहळ्यात स्वयंशिस्त असते. आपण जर स्वयंशिस्त पाळली तर आपणा बरोबर समाजाचेही भले होत असते. समाज अधिक प्रगतीपथावर जाण्यासाठी आपण स्वयंशिस्त पाळूया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा