गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

!! जागतिक वसुंधरा दिवस !! (२२ एप्रिल )

 !! जागतिक वसुंधरा दिवस !!  (२२ एप्रिल   )                    

          वसुंधरा दिवस  हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा  जगभर पाळण्यात येतो. अमेरिकेत २२ एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो, सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी,  वसुंधरा दिन पाळतात.२२ एप्रिल या दिवशी दिवस व रात्र समसमान असतात.

              पर्यावरणरक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने २२ एप्रिल  १९७० रोजी पहिल्यांदा वसुंधरा दिनाचे आयोजन केले. पहिला वसुंधरा दिन अमेरिकेत पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेला डेनिस हेस याने स्थापलेल्या संस्थेने  १९९० साली १४१ देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून वसुंधरा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. सध्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या समन्वयाने १९३ देशांमधून हा दिवस साजरा केला जातो.  २००९ साली संयुक्त राष्ट्रांनी २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली.

   सन २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र सरकारने माझी वसुंधरा अभियान राबविले होते.यामध्ये प्रमुख ५ बाबीवर प्रकाश टाकण्यात आला होता. त्या खालीलप्रमाणे....

१) पृथ्वी: **झाडांचे व्यवस्थापन नागरिकांनी स्थानिक प्रजातींच्या झाडांचे सरंक्षण करणे.

** झाडे लावणे.

** वृक्षतोड थांबवणे.

** झाडांची काळजी घेणे.

** ओला व सुका कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे.

** शौचालयाचा वापर करणे.

** आपला परिसर स्वच्छ ठेवणे.

** प्लास्टिक वापर टाळणे.

२)वायू:  **रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे.

**उज्वला गॅस अंतर्गत नवीन कनेक्शन घेणे.

३)जल: **जल, पाणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग

 ** घरावर पडणारे पावसाचे पाणी अडवणे व जिरवणे.

** छतावरील पाणी संकलन करुन बोअर किंवा विहिरीत सोडणे.

 ** तलाव ,ओढ्याची स्वच्छता करणे व त्यामध्ये केरकचरा न टाकणे.

४)अग्नी:** सौर दिवे व एलईडी लाईटचा वापर जास्तीत जास्त करणे.

 ** नवीन बायोगॅस प्रकल्प उभा करणे.

** सौर ऊर्जा पंप वापरणे.

५)आकाश:** पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शपथ घेणे.


अभयवन - 

           गत दोन वर्षांपासून वर्णे (भैरवनाथ पंचक्रोशी) मध्ये अभयवन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भैरोबाच्या डोंगरावर स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड मोठया प्रमाणात केली आहे. अंगापूर गावचे रहिवासी ऊर्जा विभागातील उच्चपदस्थ अधिकारी ऍड.अभियंता अशोकराव कणसे आणि त्यांच्या टीममधील  गणेश शेडगे, राहुल काळंगे, वैभव पवार, नथुराम घाडगे, कृष्णा घोरपडे, सध्या सेन्यात असणारे विनोद साळुंखे, गणेश काळे या सदस्यांनी काकणभर जास्तच परिश्रम घेतले, त्यांना इतर सदस्यांनी भरपूर सहकार्य केले. मलाही या कामात खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. एनएसजी कमांडो स्व. श्रीमंत काळंगे आणि अभयवन  टीम यांचे नाते मुलुखावेगळे  होते. श्रीमंत सरांच्या स्मृती जपण्यासाठी डोंगरावरील एका वडाच्या झाडाला (श्रीमंत वड ) असे नामकरण करण्यात आले आहे.झाडांना पाणी मिळण्यासाठी  अभयवन टीमने खूप परिश्रम घेतले आहेत. या टीमच्या कष्टाचा परिपाक म्हणून काही वर्षांत भैरोबाचा डोंगर हिरवागार दिसेल यात संदेह नाही.  






















         याचबरोबर ईश्वर पार्वती मंदिरानजीक वर्णेकरांनी नक्षत्रवन तयार करुन अनोखे काम केले आहे. हे नक्षत्रवन वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना वरदान ठरणार आहे. आपल्या परिसरात आपण सर्वांनी मिळून वसुंधरा हिरवीगार  करण्यासाठी प्रयत्न केला आहे.आपण सर्वजण अभयवन टीम तसेच वसुंधरा हिरवीगार करण्यासाठी जे जे प्रयत्नशील असतील त्यांना श्रमदान, आर्थिक साह्य तसेच शासकीय योजनेतून  मदत करुया. ही वसुंधरा हिरवीगार होण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया.     


     

   संकलक: राजेंद्र पवार

        ९८५०७८११७८


 #paryavaran #abhayavan #tree 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...