!! आमची नर्मदा परिक्रमा !! (६५ )
आमचा कालचा मुक्काम होलीपूरा येथील आश्रमात होता. सध्या थंडीने उच्चांक गाठल्याने सकाळी लवकर उठणे होत नाही.आजही आम्ही उशिरा चालण्यास सुरुवात केली. आज दिवसभराचा विचार केला तर कधी जंगलातून, कधी डांबरी रस्त्याने, कधी गव्हाच्या शेतातून आम्ही मार्गक्रमण केले. आज वाटेत देवगाव, पिलीकरार, बुदनी, जोशीपूर, बगबाडा आदि गावे लागली. आम्ही बालभोग (अल्पोपहार ) पिलीकरार येथे तर दुपारचा भोजनप्रसाद बुदनी घाट येथे घेतला. बुदनी येथे महाराणा प्रताप यांचा पुतळा दिसून आला. बुदनी हे तालुक्याचे ठिकाण आहे. शहर बऱ्यापैकी विकसित वाटले.
आज वाटेत जोशीपूर येथे मंदिर आणि दर्गा एकत्र दिसून आला. येथे भाविकांची गर्दी बऱ्यापैकी होती. हिंदू-मुस्लीम यांची प्रार्थनास्थळे एकत्र दिसून येत नाहीत परंतू आज अनोखे दर्शन झाले. भेदभाव हे मानवनिर्मित आहेत. दोन्हीही धर्मियांनी अतिशय गुण्यागोविंदाने राहावे. आजच्या स्थलदर्शनाने सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. आपणही कधीही धार्मिक संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
Narmde hr🙏🙏👌👌🌷🌷 Shubecha.
उत्तर द्याहटवा