!! अभिनेते सदाशिव अमरापूरकर स्मृतिदिन !! (३ नोव्हेंबर )
सदाशिव दत्तात्रय अमरापूरकर जन्म:११ मे १९५० मृत्यू :३ नोव्हेंबर २०१४
सदाशिव अमरापूरकर हे मराठी, हिंदी चित्रपटात काम केलेले एक चांगले अभिनेते होते. आपल्या खलनायकाच्या भूमिकेने १९८३ ते १९९९ पर्यंतचा काळ त्यांनी गाजवला.ते चित्रपटात नकारात्मक ,तसेच त्याला पाठिंबा देणाऱ्या भूमिका करत.विनोदी भूमिका देखील करत असत. विशेषतः नकारात्मक भूमिकावरच जोर असे की ज्याला चित्रपटसृष्टीत खलनायक असे म्हणतात.सन १९८३ मध्ये त्यांना अर्धसत्य या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार तर १९९१ मध्ये सडक चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार मिळाला.चित्रपटाबरोबर त्यांना क्रिकेट खेळाचीदेखील आवड होती.
अमरापूरकर यांचा सामाजिक कामामध्ये देखील महत्वपूर्ण वाटा होता .अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे विश्वस्त,स्नेहालयाच्या माध्यमातून एच. आय .व्ही. एडसबाधित वैश्या,त्यांची मुले यासाठी काम, नर्मदा बचाव आंदोलनात सरदार सरोवरामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी कार्य करणाऱ्या मेधा पाटकर यांना सहकार्य, लोकशाही प्रबोधन व्यासपीठाच्या माध्यमातून लोकशाही जनजागृतीचे कार्य, अहमदनगर येथे ऐतिहासिक वास्तू संग्रहालय उभारणीसाठी निधी संकलन आदि कामात त्यांचा पुढाकार होता.
अमरापूरकरांनी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मराठी रंगभूमीवर कलाकार म्हणून कारकीर्दीची सुरूवात केली आणि शेवटी अभिनय व सुमारे पन्नास नाटकांचे दिग्दर्शन केले. ऐतिहासिक चित्रपट २२ जून १८९७ या चित्रपटाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांची भूमिका करुन त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला.
सदाशिव अमरापूरकर यांनी काम केलेले काही चित्रपट....
अर्धसत्य,चक्र, सडक, इश्क,लग्नाची बेडी, कन्यादान,भटाला दिली ओसरी, हँडस अप,काका किश्याचा आदि.
सदाशिव अमरापूरकर यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा