!! गिजुभाई बधेका जन्मदिन !!
(१५ नोव्हेंबर )
गिजुभाई बधेका जन्म:१५ नोव्हेंबर १८८५ मृत्यू:२३ जून १९३९ गिजुभाईंनी मॉन्टेसरी शिक्षण पद्धती भारतात आणण्यास मदत केली . त्यांना "मुछली माँ" ("कुजबुजणारी आई") म्हणून संबोधले जाते. बधेका हे उच्च न्यायालयाचे वकील होते, तथापि आपल्या मुलाच्या जन्मानंतर, त्यांना बालपणातील विकास आणि शिक्षणात रस निर्माण झाला. १९२० मध्ये, बधेका यांनी "बाल मंदिर"(बालवाडी) पूर्व-प्राथमिक शाळेची स्थापना केली .
खरतरं गिजुभाईंना रोजीरोटी मिळवण्यासाठी आफ्रिकेला जावे लागले. गिजुभाईंच्यावर आफ्रिकेत सॉलिसिटर एसपी स्टीव्हन्स यांचा जास्त प्रभाव पडला. त्यांनी गिजुभाईंना स्वावलंबी होण्याचा सल्ला दिला. नंतरच ते मुंबईला आले, कायद्याचे शिक्षण घेतले, वकील झाले,न्यायाधीश झाले.मुलाच्या जन्मानंतर नोकरीचा त्याग केला.शिक्षणकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. थोडक्यात पूर्वप्राथमिक शिक्षण सुरु करण्याचे श्रेय गिजुभाईंना जाते. त्यांनी लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली होती.
जन्मदिनाच्या निमित्ताने गिजुभाई बधेका यांना विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा