!! पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली जन्मदिन !!
(१२ नोव्हेंबर)
डॉ. सलीम अली ( सलीम मोईझुद्दीन अली- जन्म १२ नोव्हेंबर इ.स. १८९६ ; मृत्यू- २० जून इ.स. १९८७) हे भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी होते. सलीम अली यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्या कार्याने भारतात हौशी पक्षिनिरीक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील हे पक्षी निरीक्षक सलीम अली यांना आद्य गुरू मानतात. त्यांना birdman of India असे ही संबोधले जाते.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा