वर्णे गाव विकासाचे रोल मॉडेल व्हावे:
प्रांताधिकारी मिनाज मुल्ला
वर्णे येथील ईश्वर- पार्वती मंदिरानजीक नव्याने साकारलेल्या नक्षत्र वनास दिलेल्या भेटीप्रसंगी मार्गदर्शन करताना मा.मिनाज मुल्ला म्हणाले की, लोकसहभागातून महाराष्ट्रात फार मोठी कामे झाली आहेत.विशेषतः जलसंधारण, वृक्षारोपण, पर्यावरणरक्षण यांचा उल्लेख करावा लागेल. वर्णे ग्रामस्थांनी एकत्र येत
नक्षत्रवनाची निर्मिती केली आहे ती संपूर्ण जिल्ह्याला आदर्शव्रत अशी आहे.नक्षत्र वनाच्या निर्मितीमुळे विज्ञान शाखेच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना परिसर भेटीची चांगली सोय झाली आहे.या कामाच्या माध्यमातून वर्णे गाव विकासाचे रोल मॉडेल व्हावे असे ते म्हणाले. याप्रसंगी मंडलाधिकारी श्री युवराज गायकवाड,गावकामगार तलाठी श्रीमती
रेखा कोळी,सामाजिक वनीकरण विभागाचे श्री अशोक कदम तसेच प्रकाश हिवराळे ,गावचे सरपंच विजयकुमार पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, चित्रपट निर्माते मानसिंग पवार, राहुल काळंगे,शशिकांत पवार, दिपक पवार, बाळासाहेब साळुंखे, कारखान्याचे माजी संचालक रामचंद्रपवार,पां.प.पवार,सुनिल पवार,संतोष पवार,जयवंत पाटील, दादासाहेब पवार, शरद पवार, अभिजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंदिर परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपनाच्या महत्त्वाबाबत ते पुढे म्हणाले की, आपण वड, पिंपळ,अर्जुन, हिरडा, बेहडा, आवळा, सप्तपर्णी, बकुळ, पळस असे देशी वृक्ष लावले पाहिजेत. या वृक्षामुळे प्राण्यांना, पक्ष्यांना उत्तम अधिवास मिळतो. अशा वृक्षामुळे आपणास ऑक्सिजन मिळतो. या परिसरात अभयवन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून डोंगरावर हजारो वृक्षांची लागवड केली, ते उत्तमरीत्या जतन केले आहेत. या झाडांना बारमाही पाण्याची व्यवस्था केली आहे त्याबद्दल त्यांनी संस्थेच्या क्रियाशील सदस्यांचे कौतुक केले. गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी
जलसंधारणाची कामे होणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी वाहनांच्या इंधनाची व्यवस्था केली तर यंत्रसामग्री उपलब्ध करुन देण्याचे अभिवचनही त्यांनी दिले. ग्रामस्थांनी गावच्या विकास कामासाठी आठवड्यातील किमान दोन ते तीन तास द्यावेत. आपल्याच जिल्ह्यातील माण,खटाव सारख्या तालुक्यातील लोकांनी आपल्या गावांचे चित्र बद्लेले आहे. आपण त्यांचा आदर्श घ्यायला हवा. आपण श्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करा,आमची त्यासाठी उपस्थिती असेल.आपणच करुया आपल्या गावचा विकास असे ठरवले तर गावाचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. ग्रामपंचायतीने विकासाचा प्रारुप आराखडा तयार करावा, प्राधान्यक्रम ठरवावा. सदर कामाच्या पूर्ततेसाठी शासन स्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
गावकऱ्यांनी मनावर घेतले तर आदर्श कामांची निर्मिती होते हेच आजच्या कार्यक्रमातून दिसून येते. चला तर आपला गाव आदर्श होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करुया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा