!! जागतिक शिक्षक दिन. !!
(५ ऑक्टोबर )
आपल्या देशात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस (५सप्टेंबर ) शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी शिक्षकांचा सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे ५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
हा शिक्षक दिन साजरा करण्या पाठीमागची प्रमुख कारणे:
१) जगभरातील शिक्षकांची स्थिती अभ्यासणे.
२)शिक्षक भरती,प्रशिक्षणे, सेवा यांचा विचार करणे.
३)जगभरातील शिक्षकांचे कौतुक करणे. तसेच समस्यांचे निराकरण करणे.
४) अध्यापनातील बाबींचा विचार करणे.
युनेस्कोतर्फे हा दिवस १९९४ पासून जगभर सुमारे १०० पेक्षा जास्त देशात साजरा केला जातो. युनेस्को आणि एज्युकेशन इंटरनॅशनल (ईआय) दरवर्षी शिक्षकांसाठी अनेक मोहिमा राबवत असतात. शिक्षकांच्या विषयी समाजात जागरुकता निर्माण करणे. ऑस्ट्रेलिया मध्ये या काळात सुट्ट्या पडत असल्याने तेथे हा दिवस ऑक्टोबर महिन्याचा शेवटी साजरा केला जातो.
संपूर्ण जगभरातील शिक्षकांना या दिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
(युनेस्को- UNESCO- The United Nations Educational, Scientific and Cultural Organization)
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
उत्तर द्याहटवा