!! सरदार वल्लभभाई पटेल जन्मदिन
तथा राष्ट्रीय एकता दिवस !!
(३१ ऑक्टोबर )
सरदार वल्लभभाई पटेल जन्म:३१ ऑक्टोबर १८७५ मृत्यू:१५ डिसेंबर १९५०
३१ ऑक्टोबर हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस असून तो राष्ट्रीय एकता दिवस म्हणून २०१४ पासून साजरा केला जातो. जगाचा विचार करता भारत हा लोकसंख्येने दोन नंबरचा देश आहे. आपल्या देशात १६०० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात.हिंदू, शीख,बौद्ध, जैन, इस्लाम तसेच पारशी धर्माचे लोक असून,त्यांची भाषा वेगळी, प्रांत वेगळे, वेशभूषा वेगळी, रीतिरिवाज वेगळे असणारा असा देश आहे.
राष्ट्रात एकता असेल तरच तो देश मजबूत होतो,देशात शांतता प्रस्थापित होते, देश समृध्द होतो. देशाला एकजूट करण्याचे श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांनाच जाते. आपल्या देशात एकता नसल्याने इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले.आपल्या देशात ५६५ संस्थाने होती त्यांचे एकीकरण पटेल यांनी केले त्यामुळे त्यांना पोलादी पुरुष असे म्हटले जाते.
भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात वल्लभभाई पटेल यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. ते महात्मा गांधीजींचे अनुयायी होते. बारडोलीच्या सत्याग्रहात जनतेने त्यांना सरदार ही पदवी बहाल केली. ते भारताचे उपपंतप्रधान तसेच गृहमंत्री होते.
नर्मदा नदीच्या काठावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा त्यांच्या विशालतेचे महत्व पटवून देतो. आजच्या दिवशी मरेथॉनचेही आयोजन केले जाते. ह्या रनला "Run For Unity"असे म्हटले जाते.सरदार पटेल यांना भारत सरकारने १९९१ला "भारतरत्न" हा सर्वोच्च 'किताब मरणोत्तर दिला. या दिवसाच्या निमित्ताने देशात ऐक्य कसे वाढेल यासाठी सर्वजणच प्रयत्न करुया, सरदार पटेल यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा