!!ईद-ए-मिलाद !! (१९ ऑक्टोबर )
इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी, रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाममध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वांत मोठा दिवस असल्याचे मानले जाते.
इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर यांनी दिलेला मानवतेचा आणि शांततेचा संदेश सर्वत्र पोहोचविण्यासाठी ईद-ए-मिलादच्या दिवशी उरूस आयोजित केला जातो.
मोहम्मद पैगंबर यांनी आपल्या जीवनात समानता, सौहार्द, शांतीचा संदेश दिला. हाच संदेश जनमानसात रुजावा यासाठी मौलाना आपल्या भाषणातून उपदेश करतात. ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा