!!एक दौड देशके नाम,Indian Running Day, स्वातंत्र्यदिनानिमित्त मॅरेथॉन !!
(१५ ऑगस्ट )
७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अहमदाबाद येथील Cyruns Sports & Wellness क्लबने Virtual Run चे आयोजन केले होते. मी या स्पर्धेत हाफ मॅरेथॉनमध्ये (२१ कि. मी.) मध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी वर्णे हायस्कूल- अपशिंगे (मि .)-बोरगाव- नागठाणे-नागठाणे पेट्रोल पंप-सर्व्हिस रोडने परत बोरगाव- बोरजाई मंदिरमार्गे-अपशिंगे (मि.)-परत वर्णे असा मार्ग निवडला होता. मी हे अंतर १.५९.५६ (एक तास एकोणसाठ मिनिटे छप्पन सेकंद ) एवढ्या वेळात पूर्ण केले. मी एकटाच धावलो. रुटसपोर्ट दादासाहेब सुतार यांनी दिला.
यावेळी भारताचा राष्ट्रीय ध्वज "तिरंगा" घेऊन धावायचे होते.या स्पर्धेची थीम "वसुधैवकुटुंबकम" अशी होती. संपूर्ण विश्वाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रतिज्ञादेखील म्हणायची होती. ती प्रतिज्ञा खालीलप्रमाणे होती.
I Rajendra Vitthal Pawar taking this pledge on Indian Running Day.I pledge to build a diseasefree body & contribute to my wellbeing & supporting my family,my society,my country and to the world.I pledge to work daily to celebrate health and promote fitness.Jai Hind
कोविड-१९ मुळे आरोग्याचे महत्व प्रत्येकाला समजले आहे. खऱ्याअर्थाने(Health is Wealth) आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे ती जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे..एखादा आजार जगात कुठेही आला तरी त्याचा आपणास त्रास होतो हे कोरोनाने दाखवून दिले आहे म्हणून आपण विश्व कल्याणाची प्रार्थना करुया.सारेजण निरोगी राहण्यासाठी प्रयत्नशील राहूया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
Nice Sir
उत्तर द्याहटवाअभिनंदन सर .
उत्तर द्याहटवाअभिनंदन सर. तुमच्यापासून आम्हाला नेहमीच प्रेरणा आणि मोटिव्हेशन मिळते
उत्तर द्याहटवाCongratulations saheb really your all work is very very inspiring & great.
उत्तर द्याहटवा