शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

!! चले जाव चळवळ !! (८ ऑगस्ट )

 

!! चले जाव चळवळ !! (८ ऑगस्ट )




              चले जाव चळवळ  ही ऑगस्ट १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सूरू झालेले नागरी असहकार आंदोलन होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.
          १९४२ च्या चळवळीने देशव्यापी आंदोलनाचे स्वरुप धारण केले. स्वातंत्र्य प्राप्तीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला.अनेकांनी आत्मबलिदान केले. आंदोलकांची संख्या इतकी प्रचंड होती की,त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला.    या राष्ट्रव्यापी आंदोलनाला.  "ऑगस्ट क्रांती' असेही म्हटले जाते.         
संकलक: राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...