शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

!! राष्ट्रीय क्रीडा दिवस !! (२९ ऑगस्ट )

 

      !!   राष्ट्रीय क्रीडा दिवस  !!
                 (२९ ऑगस्ट )




               ध्यानचंद यांचा जयंती दिन ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा होणार
भारतीय हॉकीचे मानांकित खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या २९ ऑगस्ट या जयंती दिनानिमित्त संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जाणार आहे.
भारतीय हॉकीचे मानांकित खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या २९ ऑगस्ट या जयंती दिनानिमित्त संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जाणार आहे. ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा कऱण्याचे ठरविण्यात आले होते. 
त्यानंतर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा कऱण्याचे निश्चित करण्यात आले.
      युवा आणि खेळ मंत्रालयाचे सचिव ओंकार खेडीया म्हणाले, “देशात क्रीडा संस्कृती वाढावी, जपून रहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आजही आपण इतर देशांसारखा खेळाचा गांभीर्याने विचार करत नाही. आपल्याकडे आजही खेळाडूंना योग्य मानसन्मान मिळत नाही. त्यामुळे क्रिडा दिवस साजरा करुन खेळ संस्कृतीच्या महत्वाची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. त्यानुसार २९ ऑगस्टला देशभर विविध ठिकाणी क्रीडा संस्कृतीशी निगडीत कार्यक्रम होणार आहेत.” 
नुकतेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे.दिनांक २७ ऑगस्ट रोजी पुणे येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला नीरज चोपडा यांचे नाव देण्यात आले त्याचे उदघाटन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी संरक्षण मंत्रांच्या हस्ते आर्मी स्पोर्ट क्लब मधील ऑलिम्पिकसह कॉमनवेल्थमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना विशिष्ट सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात नीरज चोपडा, प्रवीण जाधव,मनीष कौशिक,सतीश कुमार,सी. ए. कट्टपा, छोटेलाल यादव (मेरी कोमचे कोच),दीपक पुनिया, आर्वेदसिंग, अर्जुनलाल जाट,विष्णू सर्वानंद, दीपक कुमार,आरोग्य राजीव, अविनाश साबळे, के. टी. इरफान, संदीप कुमार, कुलदीप सिंग,शिवपाल सिंग, लेक्स अँटनी, अभिषेक पांडे यांचाही सत्कार करण्यात आला.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा.
संकलक :राजेंद्र पवार
             ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...