!! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जन्मदिन !! (२२ जुलै )
अजितदादा पवार जन्म: २२ जुलै १९५९ हे महाराष्ट्र राज्यातील एक परखड राजकारणी आहेत , ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे पुतणे आहेत .
अजित अनंतराव पवार यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. त्यांनी प्रवरा येथील देवळाली येथे आपले शिक्षण पूर्ण केले.
अजित पवार हे शरद पवार यांचे थोरले भाऊ अनंतराव पवार यांचे पुत्र आहेत.अजित पवार आपल्या पदवीचे शिक्षण घेत होते परंतु वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांना औपचारिक शिक्षण सोडावे लागले, आणि आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यास त्यांनी सुरवात केली.
अजित पवार देवळाली प्रवरा येथे प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांचे काका शरद पवार हे सत्ताधारी कॉंग्रेसमधील एक राजकीय नेते बनले होते. १९८२ मध्ये अजितदादांची साखर संघावर निवड झाली.त्याचवेळी खऱ्याअर्थाने त्यांनी राजकारणात प्रवेश केला . १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि ते १६ वर्षे या पदावर राहिले. या काळात बारामती लोकसभा मतदार संघातून ते लोकसभा सदस्य म्हणूनही निवडून आले.नंतर त्यांनी आपली जागा काकांसाठी सोडली. लोकसभा सदस्य म्हणून शरद पवार निवडून आल्यानंतर पी.व्ही.नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षणमंत्री बनले.त्यानंतर अजित पवार हे बारामती येथून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून १९९५,१९९९,२००४,२००९ आणि २०१४,२०१९ मध्ये त्याच मतदारसंघातून पुन्हा पुन्हा निवडून आले आहेत. त्यांची आपल्या मतदारसंघावर प्रचंड कमांड आहे.
अजितदादांनी कृषी,ऊर्जा, मृदसंधारण,नियोजन, जलसंपदा ही खाती सुधाकरराव नाईक,विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे,अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात सांभाळली. ते सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
अजितदादा पवार प्रचंड संघटन कौशल्य असणारी व्यक्ती आहे. कोणत्याही परिस्थितीत मनात आलेली गोष्ट करणारच. कडक शिस्त असणारे, प्रशासनावर पकड असणारे, एक अभ्यासु
व्यक्तिमत्व म्हणून सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत.
अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेवतीने
"राष्ट्रवादी जीवलग" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कोरोनामुळे ज्या मुलांनी आपल्या पालकांना गमावले आहे
त्यांच्यासाठी हा उपक्रम असणार आहे. अशा मुलांना आधाराची गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी पक्षाच्यावतीने मुलगा असेल तर पुरुष "राष्ट्रवादी दूत" आणि मुलगी असेल तर स्त्री "राष्ट्रवादी दूत" म्हणून काम करणार आहे. थोडक्यात या मुलांना आधार देण्याचे काम पक्षाच्या वतीने केले जाणार आहे. या उपक्रमाला आपले सहकार्य अपेक्षित आहे.
संपूर्ण सातारा जिल्हावासीयांच्या वतीने अजितदादा यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
संकलक: राजेंद्र पवार
उपाध्यक्ष
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टी,सातारा.
अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
उत्तर द्याहटवाHappy birthday
उत्तर द्याहटवा