शनिवार, ३ जुलै, २०२१

!! कर्मवीर छायेतील रत्नदीप पुस्तक प्रकाशन सोहळा !! (३ जुलै )

 !! कर्मवीर छायेतील रत्नदीप पुस्तक प्रकाशन सोहळा !! (३ जुलै)






    इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक,शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून धुरा संभाळलेले बॅरिस्टर पी.जी.पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने सरांच्या जीवन कार्यावर आधारित "कर्मवीर छायेतील रत्नदीप" हे पुस्तक तरुण पिढीला दिशादर्शक  ठरेल असे उदगार सिक्कीमचे

माजी राज्यपाल ,लोकसभा सदस्य मा. श्रीनिवास पाटील यांनी पुस्तक 

प्रकाशनप्रसंगी काढले.सदरचा कार्यक्रम सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड येथे संपन्न झाला. कोविडच्या नियमांचे पालन करुन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी बरेचजण ऑनलाईन सहभागी झाले होते. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.व्ही.एस.शिवणकर, प्राचार्य आर.डी. गायकवाड, कॉम्रेड सयाजी पाटील,  कोन्सिल सदस्य ऍड. रविंद्र पवार, रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे इंस्पेक्टर राजेंद्र साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन राजमाने, सातारा जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे,सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवासंघ साताराचे सचिव आणि या पुस्तकाचे संपादक आर. एल.नायकवडी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक सेवानिवृत्त मुख्याध्यापक उपस्थित होते.

       यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी.शिर्के आभासी पध्दतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून पी. जी. पाटील सरांनी कार्यभार सांभाळला होता त्याच दालनातून सरांविषयी विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली याचा मला विशेष आनंद होत आहे. सर ऊर्जेने खचाखच भरलेला स्रोत होते, तीच ऊर्जा ग्रामीण तसेच शहरी विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा देत राहील असे शिर्के सर म्हणाले.

 समर्पित भाव, विद्यार्थी विकास हाच खरा ध्यास याप्रमाणे पी. जी. सर वागले, त्यांच्यामुळे संस्थेचे नाव सातासमुद्रापार पोहोचले याचा आम्हाला अभिमान वाटतो असे उदगार सचिव डॉ. शिवणकर यांनी काढले.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला या पुस्तकाचे संपादक आर.एल. नायकवडी यांनी हे पुस्तक चार विभागात विभागले असून पुस्तकाच्या निर्मितीत योगदान दिलेल्या सर्वच मान्यवरांचे ऋण व्यक्त केले. या सर्वांचाच सत्कार खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

       महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी प्रास्ताविक व  सर्वांचे स्वागत महाविद्यालयाच्यावतीने केले. आभार एस. बी. खराते सर यांनी मानले. नेटका कार्यक्रम कसा असावा याचे उत्तम उदाहरण आजचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते की " कर्मवीर छायेतील रत्नदीप" हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावयास हवे.

          राजेंद्र पवार 

     ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...