सोमवार, ५ जुलै, २०२१

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराची स्थापना !!(६ जुलै )

 

!!भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराची स्थापना !!(६ जुलै )



                    भांडारकर प्राच्यविद्या संशोधनसंस्था ही महाराष्ट्रामधील पुणे
 शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे .पुण्यातील भांडारकर रस्ता किंवा विधी महाविद्यालय रस्त्यावर ६ जुलै १९१७ रोजी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संशोधन संस्था आहे. ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत.
                 प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा.ना. दांडेकर यांनी ५४ वर्षे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदाची धुरा सांभाळली होती. संस्थेच्या डॉ. रा.ना. दांडेकर ग्रंथालयामध्ये भारतीय आणि युरोपियन भाषेतील सव्वा लाख पुस्तकांचा समावेश असून त्यापैकी २० हजार पुस्तके दुर्मिळ आहेत. प्राकृत शब्दकोश हा महत्त्वपूर्ण प्रकल्प संस्थेने पूर्णत्वास नेण्याकडे वाटचाल केली आहे. केवळ अभ्यास आणि संशोधन या कार्यालाच वाहून घेतलेल्या अभ्यासकांची पिढी घडविण्याचे कार्य संस्थेने केले आहे.
              पहिल्या पिढीतील अभ्यासक आणि थोर समाजसेवक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि हितचिंतकांनी भांडारकर संस्थेची स्थापना केली. ६ जुलै १९१७ रोजी भांडारकर यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा योग साधून संस्था कार्यरत झाली. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या ताब्यात असलेला हस्तलिखितांचा ठेवा १९१८ मध्ये संस्थेकडे देणगी म्हणून सोपविण्यात आला.
        संस्थेच्या स्थापनेसाठी 'आनंदाश्रमा'मध्ये झालेली बैठक, डॉ. रामकृष्ण भांडारकर, डॉ. नरहर सरदेसाई, डॉ. श्रीपाद बेलवलकर यांचे संस्थेच्या स्थापनेपासूनचे योगदान, संस्थेकडील हस्तलिखितांच्या संग्रहामध्ये होत असलेली प्रगती आणि त्याचे जतन करण्यासाठी होणारे प्रयत्न, संस्थेमध्ये कार्य करणाऱ्या सर्व ज्येष्ठ संशोधकांचे काम आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींचा या इतिहासामध्ये समावेश होणार आहे. संस्थेमध्ये झालेल्या महाभारताची चिकित्सक आवृत्ती, धर्मशास्त्राचा इतिहास, महाभारताची स्वीकृत संहिता, महाभारताची श्लोक सूची, प्राकृत शब्दकोश अशा विविध संशोधन प्रकल्पांच्या कामांची पार्श्वभूमीही या इतिहासामध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचे समजते. हे पुस्तक सुमारे तीनशे पानांचे असेल.भांडारकर संस्थेत आपणास प्रत्येक धर्मियांचे दुर्मिळ ग्रंथ पहावयास मिळतील. प्राचीन संस्कृतीचा चिकीत्सक अभ्यास करणारासाठी या संस्थेची निश्चितच मदत होणार आहे.
     संकलक: राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...