शुक्रवार, २ जुलै, २०२१

सुनीता पुरुषोत्तम देशपांडे जन्मदिन !! (३ जुलै)

 

!!सुनीता पुरुषोत्तम देशपांडे जन्मदिन !!
  (३ जुलै)




मराठी लेखिका आणि चित्रपट अभिनेत्री
सुनीता देशपांडे जन्म:३जुलै१९२५ रत्नागिरी, महाराष्ट्र मृत्यू : ७ नोव्हेंबर  २००९पुणे, महाराष्ट्र
           पूर्वाश्रमीचे नाव सुनीता ठाकूर, या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे त्यांचे पती होते.
        पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न१२ जून १९४६ रोजी झाले. पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच 'वंदेमातरम्' या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. 'नवरा बायको' या चित्रपटातही त्यांनी काम केलेले आहे. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या 'सुदर मी होणार' मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती.
         सुनीता देशपांडे यांना जी.ए.कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला ’प्रिय जीए पुरस्कार’  २००८मध्ये मिळाला होता.
     सुनीता देशपांडे यांना विनम्र अभिवादन.
   संकलक: राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...