!! फ्रान्स राज्यक्रांती !! (१४ जुलै )
सन १७८९ साली फ्रान्समध्ये प्रचंड उलथापालथ झाली. तेथे सामान्य जनतेने उठाव केला. राजसत्ता कोलमडून पडली. राज्यक्रांती घडून तरी का आली?
फ्रान्समध्ये राजेशाही होती. समाजरचनेचा विचार केला तर ती रचना त्रिस्तरीय होती. पहिला वर्ग धर्मगुरूंचा,दुसरा उमराव व सरदारांचा तिसरा वर्ग सामान्य जनतेचा. पहिल्या दोन वर्गाची टक्केवारी ४% तर उर्वरित जनता ९६%,पहिल्या दोन्ही वर्गाला कोणतेही कर नाहीत आणि भरपूर सवलती, राजासुध्दा पहिल्या दोन वर्गाच्या बाजूने असल्याने खरी क्रांती झाली.
विषमतापूर्ण समाजजीवनामुळे सामान्य जनतेत प्रचंड असंतोष वाढीस लागला आणि तिसऱ्या वर्गाच्या असंतोषाचा प्रचंड उद्रेक १७८९ मध्ये झाला. राज्यक्रांती घडवून आणण्यासाठी मॉंटेंस्कु, व्हॉटेअर, रुसो या विचारवंतांनी फार मोठे काम केले.सामान्य जनतेने (तिसऱ्या वर्गाने ) क्रांती केली.राजा प्रतिनिधी विरोधात काही करु शकला नाही. हळूहळू क्रांतीचे लोन सर्वत्र पोहोचले.१४ जुलै १७८९ रोजी पॅरिसमधील बॅस्टीलच्या तुरुंगावर सामान्य जनतेनं हल्ला केला. दारुगोळा हस्तगत केला. कैद्यांना मुक्त केले. बॅस्टीलचा पाडाव स्वातंत्र्याचे प्रतीक बनले.
मानवी इतिहासात फ्रान्सच्या राजक्रांतीचा उल्लेख जनतेचा एक यशस्वी उठाव असाच केला जातो.अनियंत्रित राजसत्ता ही अनैतिकचअसते हे तत्वही या क्रांतीने कायमचे प्रस्थापित केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता,घटनात्मकता,लोकशाही ही मूल्ये या राज्यक्रांतीने जगाला दिली.
जगातील पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्रांना,विविध बंधनात जखडलेल्या समाजाला ही राज्यक्रांती प्रेरणादायी ठरली आहे.आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यामध्येही या राज्यक्रांतीचा फार मोठा वाटा आहे.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा