शनिवार, १० जुलै, २०२१

जागतिक लोकसंख्या दिन !! (११ जुलै )

 

!!जागतिक लोकसंख्या दिन !! (११ जुलै )




   
               प्रत्येक वर्षी जगभरामध्ये ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या (World Population Day 2020) नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे, याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उपक्रम राबवले जातात.
जेणेकरून लोकसंख्या नियंत्रणात राहणे आवश्यक आहे, याबाबत योग्य पद्धतीने जनजागृती होण्यास मदत मिळेल. जगातील अनेक देशांसमोर लोकसंख्या वाढीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः विकसनशील देशांमधील वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब आहे.
     ११ जुलै १९८७ रोजी संयुक्त विकास कार्यक्रमांतर्गत ‘जागतिक लोकसंख्या दिन’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. ११ जुलै १९८७ पर्यंत जगाची लोकसंख्या ५०० कोटी इतकी होती. ही संख्या पाहता लोकसंख्या नियंत्रणात राहावी, यासाठी जगभरामध्ये कार्यक्रम घेण्यात आले. लिंग समानता, कुटुंब नियोजन, गरिबी, महिलांचे आरोग्य,  इत्यादी विषयांवर जनजागृती करण्यात आली. आजही जागतिक लोकसंख्या दिनी जनजागृती करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्यामध्ये सोशल मीडिया, विविध सामाजिक कार्यक्रम व मेळावे, रोड शो, पथ नाटके इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात.    
    लोकसंख्येचा डेटा
जनगणनेसोबत विविध माध्यमांद्वारे लोकसंख्येविषयी डेटा जमवला जातो. उदाहरणार्थ स्त्री-पुरुष संख्येचे गुणोत्तर, जन्मदर, मृत्युदर, आरोग्य इत्यादी. या सर्व माहितीचा देशाच्या नियोजनासाठी उपयोग होतो.
        वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम.... 
१) बेरोजगारी : लोकसंख्या वाढल्याने लोक रोजगाराच्या शोधात वेगवेगळ्या शहरांकडे वळू लागले. नोकरीच्या संधी कमी झाल्याने बेरोजगारी वाढूही लागली. परिणामी गरिबीमध्येही झपाट्याने वाढ होऊ लागली. साधनसंपत्तीची कमतरता भासू लागली.
२)रोगराई : वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्याच्या सोयी देखील अपुऱ्या पडू लागल्या. साथीचे रोग मोठ्या प्रमाणात पसरू लागले.
प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला. पोटासाठी जंगले तोडून, वन्यजीवांना मारण्याचे प्रकार वाढू लागले. यामुळे निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
आपले भविष्य वाचवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात राहणे अतिशय गरजेचं आहे. यासाठी प्रत्येकाने योगदाने द्यावे.
संकलक : राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...