!! किरण बेदी जन्मदिन !! (९ जून )
किरण बेदी जन्म : अमृतसर-पंजाब, ९ जून १९४९ या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. मसूरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये ८० पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या.
किरण बेदी यांची पोलीस अधिकारी म्हणून पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली. पुढे त्या उत्तर आणि पश्चिम दिल्लीच्या पोलीस आयुक्त झाल्या. १९९३ मध्ये दिल्लीतील तिहार कारागृहाच्या त्या मुख्य अधीक्षक (इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन्स) झाल्या. तेथे असताना त्यांनी कारागृहामध्ये अनेक सुधारणा केल्या. त्याची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली आणि या सुधारणेसाठी १९९४ मध्ये त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.त्यांनी महिलांवरील गुन्हे कमी करून दाखवले. त्यानंतर एक ट्रॅफिक पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी १९८२ आशियाई गेम्ससाठी दिल्लीत आणि १९८३ मध्ये गोव्यात भरलेल्या सीएचओजीएम बैठकीसाठी (The Commonwealth Heads of Government Meeting) रहदारी व्यवस्था पाहिली.
किरण बेदी यांनी उत्तर दिल्लीच्या डीसीपी असताना ड्रग्जचा दुरूपयोग करण्याऱ्यांविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात केली. ही मोहीम पुढे नवज्योती दिल्ली पोलीस फाऊंडेशन (२००७मध्ये हिचे नाव नवज्योती इंडिया फाऊंडेशन म्हणून बदलले)मध्ये विकसित झाली. २००३मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव म्हणून पोलीस सल्लागार म्हणून बेदींनी काम केले. शांतता ऑपरेशनचा या सामाजिक कार्यक्रम आणि लेखन यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी २००७मध्ये पोलीस खात्याचा राजीनामा दिला. किरण बेदी यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्या इंडिया व्हिजन फाऊंडेशन नावाची संस्थेच्या संचालक आहेत. २००८-२००९ दरम्यान त्यांनी दूरचित्रवाणीवर 'आप की कचेरी ' हा एक कोर्ट शो आयोजित केला.
२०११ च्या भारतीय भ्रष्टाचारविरोधी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी त्या एक होत्या आणि जानेवारी २०१५ मध्ये त्या भारतीय जनता पार्टीत सामील झाल्या. २०१५च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून असफल निवडणूक लढवली. २२मे २०१६ रोजी बेदी यांना पॉंडिचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले.
निवृत्तीनंतर (अण्णा हजारे) यांच्या लोकपालासाठीच्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या.
किरण बेदी यांना जन्मदिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा