शनिवार, १२ जून, २०२१

!! आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृतिदिन !! (१३ जून )

 

!! आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृतिदिन !!
   (१३ जून )



जन्म : १३ ऑगस्ट १८९८मृत्यू :१३ जून १९६९ प्र. के.अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, नाटककार, कवी, संपादक,पत्रकार, दिग्दर्शक, शिक्षक, राजकारणी वक्ते  होते.
ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. फार काय, आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. त्यांचे बाळासाहेब यांच्याशी असलेले वाद ही फार चर्चेत होते.
प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे हे पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द या गावात जन्मले.त्यांचा जन्म १३ ऑंगस्ट १८९८ रोजी झाला.
                     इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. इ.स. १९२६ मध्ये 'रत्‍नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. १९ जानेवारी १९४० रोजी त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. ८ जुलै १९६२ पर्यंत ते चालू होते. २ जून १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. १५ नोव्हेंबर १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. २१ जानेवारी १९४० ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरु केले. त्यावेळी अत्रे कॉंग्रेसमध्ये होते. त्यामुळे कॉंग्रेसची विचारसरणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत मांडली जात होती.
           आचार्य अत्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव असलेल्या अनेक संस्था स्थापन झाल्या. त्यांतली काही याप्रमाणे--
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली(पश्चिम), मुंबई
आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ, ठाणे
आचार्य अत्रे कन्या कॉलेज, पुरंदर (पुणे जिल्हा)
आचार्य अत्रे नाट्यगृह, पिंपरी (पुणे)
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा)
आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे
आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुरंदर (पुणे जिल्हा)
आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी (पुणे)
आचार्य अत्रे सभागृह, पुणे
सासवड नगरपालिकेने बांधलेले आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा)
आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे
         इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस' साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रॅंडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
            अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स' मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.
                   मुंबईत पहिले सहा महिने सॅंढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल) मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. त्यावेळी त्यांना फक्त ३५ रुपये पगार होता. ही शाळा अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र अत्र्यांना या शाळेतच मिळाला.
         जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी. टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.
आचार्य अत्रे यांना मिळालेले पुरस्कार 
१) विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. आचार्य अत्रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
          आचार्य अत्रे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
     संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...