!! श्रीकांत पवार यांचा आज वाढदिवस !! (१६ मे )
टॉप गिअर ट्रान्समिशनचे सर्वेसर्वा श्रीकांत पवार यांचा आज वाढदिवस.ते पहिल्या पिढीतील उद्योजक होत. थोडक्यात काय तर कुटुंबाला उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. आपल्या गावच्या भूमिपुत्राचा उद्योजकतेचा प्रवास कसा झाला याविषयी माहिती जाणून घेऊया.
श्रीकांत पवार बी. ई.(प्रॉडक्शन) झाले. सुरुवातीला काही वर्षे एका उद्योगात नोकरी केली. नोकरी करत असताना सातारा एम.आय.डी.सी.मध्ये आपल्या कुटुंबियांच्या सहकार्याने एक सिक युनिट विकत घेतले. त्याचे सिध्दगिरी एंटरप्राइजेस असे नामकरण करण्यात आले. सुरुवातीला इमारतीसाठी लागणाऱ्या खिडक्या, दरवाजे व ट्रॅक्टर ट्रॉल्या कॅन्सट्रक्शन मशीन बनवण्याचे काम केले जात होते.नोकरी व व्यवसाय आशा दुहेरी भूमीका काही दिवस केल्या नंतर त्यांनी नोकरी सोडून पूर्ण व्यवसाय करण्याचे ठरवले. अनेक अडचणीना तोंड देत त्यांनी १९९८ ला टॉप गियर ट्रान्स मिशन ची स्थापना केली.
श्रीकांत पवार यांना प्लॅनेटरी गिअर बॉक्स हा विषय मनापासून आवडायचा. आवडीच्या क्षेत्रात काम करायला प्रत्येकालाच आवडते.कॉलेज जीवनापासूनच गियर या विषयाची आवड असलेमुळे अनेक प्रकारचे गियरबॉक्स चे संशोधन आणि डिझायन ही त्याच्या रूपाने भारतीय उद्योगाला मिळालेली एक देणगीच आहे .व त्यासाठी भारताचे पूर्व राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम साहेबाचे हस्ते त्यांना नॅशनल अवॉर्ड फॉर इंडिजिनेशन ऑफ टेकनॉलॉजि व असेच अनेक बहुसंख्य राष्ट्रीय अवॉर्ड मिळाले आहेत.
टॉप गियर मध्ये तयार होणारे गियर बॉक्स जगातील २३ देशात निर्यात होतात . तसेच भारतात अनेक ठिकाणी टॉप गियरचे गियर बॉक्स वापरले जातात .यामधे केमिकल, प्लास्टिक, खाणी, पोलाद डिफ्फेन्स, मोबाईल क्रेन आशा ठिकाणी तर साखर उद्योगामध्ये भारतात टॉप गिअरचे गियर प्राधान्याने वापरले जातात. गियर बॉक्स निर्मितीमध्ये टॉप गिअरचे नाव जागतिक नकाशावर झळकत आहे.
शेतीत यांत्रिकिंकरण आले आहे ,शेतकऱ्यांची गरज ओळखून पॉवर टिलरचे उत्पादन गतवर्षापासून सुरु केले आहे. आज त्यांची उत्पादने जगातील २३ देशात जात आहेत. आज साहेबांच्यामुळे प्रत्यक्ष ४०० लोकांना रोजगार मिळाला आहे .साहेबांच्यावर आर्ट ऑफ लिव्हिंगचा खूप प्रभाव आहे.काडसिद्धेश्वर महाराज व श्री श्री रविशंकरजी यांचा कृपाआशीर्वाद श्रीकांत पवार यांना लाभला आहे.वर्णेचा काळभैरव त्यांच्या पाठीशी आहेच.ते आपल्या कामगारांसाठी सातारा तसेच वर्णे येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्सचे
नियोजन करतात. दरवर्षी आपल्या वाढदिवसाला गुणवंत कामगार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.
आपला उद्योग संभाळत इतर सामाजिक उपक्रमातही साहेबांचा वावर आहे. ते वर्णे येथील शिक्षण संस्थेचे(वर्णे
ग्रामविकास मंडळ, मुंबई ) अध्यक्ष आहेत.त्यांच्यामुळे आपल्या शाळेत व्यवसाय शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. असा अभ्यासक्रम असणाऱ्या जिल्ह्यात मोजक्याच शाळा आहेत. आपल्या विद्यालयाला सुंदर वास्तू साहेबांच्यामुळे लाभली. विस्तारित इमारत पूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आय.बी.टी. चे वर्कशॉप बांधून पूर्ण होईल यात संदेह नाही.
सध्या कोविड १९ चा सर्वत्र प्रादुर्भाव आहे. आपल्या गावात कोरोनाने थैमान घातले. गावात अनेकांना जीव गमवावा लागला. गाव कोरोनापासून वाचावे यासाठी आपल्या कंपनीच्या माध्यमातून २० बेडचे कोविड केअर सेंटर वर्णेच्या हायस्कूलमध्ये सुरु करण्यात आले. या सेंटरमध्ये ऑक्सिजन मशीन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.गरज वाटली तर रुग्णांना दवाखान्यात ने आण करण्यासाठी जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. थोडक्यात श्रीकांत पवार हे एक सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व आहे. आई वडिलांचा समाज सेवेचा वारसा ते जपत आहेत.
श्रीकांत पवार एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे त्यांना आपल्या उद्योगाचा विस्तार करावयाचा आहे.यामध्ये त्यांचे सर्व कुटूंब त्यांना मोलाची साथ देत आहे.
त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उद्योग भरभराटीस जाईलच.परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावे.श्रीकांत पवार यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा