मंगळवार, २५ मे, २०२१

विलासराव देशमुख जन्मदिन !! (२६ मे )

 

!! विलासराव देशमुख जन्मदिन !!
(२६ मे )



विलासराव दगडोजीराव देशमुख जन्म: २६ मे १९४५ मृत्यू : १४ ऑगस्ट २०१२
    विलासराव देशमुख यांचा प्रवास  थक्क करणारा आहे. (सरपंच ते मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री )त्यांचे शिक्षण बी. एस्सी. एल. एल.बी.असे होते. काही काळ त्यांनी वकिली केली.१९७४ ला बाभळगावचे सरपंच,त्याच वर्षी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य,१९७५ ला जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष,१९८०ला लातूर विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवड,१९८५ ,१९९०,१९९९ ला पुन्हा आमदार,१९९५ ची विधानसभा व १९९६ च्या विधानपरिषद निवडणूकित पराभव, शिवाजीराव पाटील -निलंगेकर, शंकरराव चव्हाण,शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात विविध खात्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.(कृषी,ग्रामविकास, शिक्षण,तंत्रशिक्षण,क्रीडा व युवक कल्याण,गृह,सामान्य प्रशासन,महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक, संसदीय कामकाज,फलोद्यान,लाभक्षेत्र विकास,पर्यटन, उद्योग)
        विलासराव देशमुख महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री झाले. (पहिली टर्म १९९९ ते २००३,दुसरी टर्म २००४ ते २००९ ) काँग्रेस पक्षामध्ये वरिष्ठांना कधी काय वाटेल हे सांगता येत नाही. पहिल्या टर्ममध्ये एक वर्षाचा काळ राहिला असताना सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. मुख्यमंत्री तात्काळ बदलावा अशी कोणतीही घटना घडली नव्हती.दुसऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या टर्मनंतर केंद्रात अवजड उद्योग मंत्री करण्यात आले.
    मुख्यमंत्रीपदाच्या काळात राबविण्यात आलेले महत्वाचे प्रकल्प--
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान,पहिलीपासून इंग्रजी, शिक्षकांच्या मानधनावर नेमणुका, माहिती तंत्रज्ञान शिक्षणावर भर,गुटखा  विक्री बंद, ग्रामीण विकासासाठी खास योजना,२० लाख रोजगार निर्मिती.
  महत्वाचे निर्णय--
२००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण,डान्स बार बंद करणे,नव गृहनिर्माण धोरण,डिझेल, पेट्रोल वरील जकात कमी,शेतकरी आत्महत्या आळा बसावा म्हणून खास पॅकेज ,अनावश्यक खर्चाला आळा, प्रशासकीय खर्चात कपात,अनावश्यक नोकरभरती बंद, स्वेच्छा निवृत्ती लोकप्रिय होणेसाठी खास प्रयत्न.
   त्यांच्या पश्चात अभिनेता रितेश देशमुखसह पत्नी वैशाली आणि तीन मुले  असा परिवार आहे .
   विलासराव देशमुख यांना विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

1 टिप्पणी:

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...