!! सत्यजित राय जन्मदिन !! (२ मे )
सत्यजित राय जन्म २ मे १९२१ मृत्यू - २३ एप्रिल १९९२ हे ऑस्कर पुरस्कारविजेते भारतीय लेखक, पटकथालेखक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक होते. चित्रपट जगतातील त्यांच्या कामगिरीबद्दल १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर मिळवणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत. त्यांनी अपु के वर्ष १९५० ते १९५८ व १९५५ मध्ये पथेर पांचाली या चित्रपटाची निर्मिती केली. यांनी एकूण ३७ चित्रपटांची निर्मिती केली. ते स्वतःच चित्रपटांना संगीत देत, पटकथा लेखन, दिग्दर्शन व संपादन अशी अनेक कामे करत.
यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकार तर्फे पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला. या शिवायही त्यांना युगोस्लाव्हियाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातर्फे डी. लिट. असे अनेक मान सन्मान प्राप्त झाले. फ्रान्स येथील कान चित्रपट महोत्सव यांसहित यांना एकूण ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा