!! आर्य समाजाची स्थापना !!
(१० एप्रिल )
स्वामी दयानंद सरस्वती
भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी दयानंदांनी १० एप्रिल १८७५ रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदांतील तत्त्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाश ग्रंथात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर पंथमतांचे खंडनही त्यांना करावे लागले. त्यांनी "संस्कारविधी" हा ग्रंथ लिहून सोळा संस्कारांचे वर्णन व प्रयोग याची माहिती दिली. "पंचमहायज्ञविधी" या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले.
आर्य समाजाच्या तत्त्वांचा प्रचार करण्यासाठी ते प्रथम अहमदाबाद, बडोदे, पुणे, मुंबई या ठिकाणी गेले त्यानंतर दिल्ली येथे भरणाऱ्या दरबारासाठी गेले. तेथे सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना बोलाविलेले होते व चर्चेसाठी पाच प्रश्न ठेवलेले होते. दयानंदांनी त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व विशेषत: पंजाबात त्यांच्या मताचा चांगलाच बोलबाला झाला. शैक्षणिक संस्था, गुरुकुले व अनाथालये निघून होमहवनादी वैदिक पद्धतीचे कार्यक्रम तिकडे होऊ लागले.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा