!! श्री महावीर जयंती !!
(२५ एप्रिल )
महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. शेवटचे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला.
महावीरांना जैन धर्माचा संस्थापक मानले जाते.वर्धमान महावीर हे २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी होते. ते क्षत्रिय कुटुंबात जन्मले असले तरी वयाच्या ३०व्या वर्षी सर्व ऐहिक संपत्तीचा त्याग केला.आध्यात्मिक जागृतीच्या मागे लागले, संन्यासी बनले. महावीरांनी १२ वर्षे तीव्र ध्यान आणि कठोर तपस्या केली आणि ते ज्ञानी झाले.
जैन धर्माची प्रमुख तत्वे --
१)अहिंसा २)सत्य ३)असत्येय (चौर्य
नसलेले )४)ब्रम्हचर्य ५)अपरिग्रह (न
जोडलेले)
या व्रतांचे पालन करणे आवश्यक
असल्याचे वर्धमान महावीरांनी शिकवले.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा