!! ऍडाल्फ हिटलर जन्मदिन !!
(२० एप्रिल )
ऍडाल्फ हिटलर जन्म --२० एप्रिल १८८९मृत्यू -३० एप्रिल १९४५ ऍडाल्फ हिटलरची विचारप्रणाली "नाझीवाद" म्हणून ओळखली जाते."माईन काम्फ" माझा लढा या आत्मचरित्रातून नाझीवादाचे स्वरुप स्पष्ट होते.
जर्मन प्रजासत्ताक सरकारविषयी तीव्र संताप हिटलरच्या मनात दाटला होता. व्हर्सायच्या अपमानकारक तहावर स्वाक्षरी करणारे सरकार गुन्हेगार आहे,राष्ट्रद्रोही आहे,ते कधीही आपल्या देशाचे हित करु शकणार नाही असे तो जाहीरपणे बोलत असे. जगात जर्मनीला महत्वाचे स्थान मिळवून देण्याचा त्याचा निर्धार होता. राष्ट्रासाठी कोणताही त्याग करण्याची जर्मन नागरिकाची तयारी असावी अशी त्याची शिकवण होती.
जर्मन लोक हे शुध्द नॉर्डीक (आर्य) वंशाचे आहेत आणि हाच वंश जगातील सर्वश्रेष्ठ वंश असल्यामुळे सर्व जगातील लोकांवर सत्ता गाजवण्याचे सामर्थ्य व नैतिक अधिकार जर्मन लोकांना आहेत, असे त्यांचे ठाम मत होते.
ज्यू लोकांविषयी त्याच्या मनात आत्यंतिक द्वेष व चीड होती.त्यांचा त्याने छळ केला, अनेकांना यमसदनाला पाठवले.हिटलरचा लोकशाहीला विरोध होता. सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी देशाच्या हिताचे निर्णय तातडीने घेऊ शकत नाहीत,तशी बौद्धिक क्षमता त्यांच्यात नसते, लोकशाहीपेक्षा एका प्रभावशाली व्यक्तीच्या हातातील एककेंद्री शासन देशाला अधिक उपकारक ठरते, अशी हिटलरची धारणा होती.
आत्यंतिक राष्ट्रनिष्ठा, जर्मन लोकांचे वंश श्रेष्ठत्व,ज्यू विरोध,साम्यवाद विरोध व लष्करवाद या तत्वावर नाझीवाद आधारलेला होता.१९३२ मध्ये नाझी पक्ष निवडणुकीत उतरला,पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही तरीही अल्पमतात असलेल्या पक्षांचा पाठींबा मिळवून चान्सलरपद मिळवले व सर्व सत्तासूत्रे आपल्या हाती केंद्रित केली.१९३४ मध्ये अध्यक्षपदही स्वतःकडे घेतले.
जर्मनीचे संघराज्यात्मक स्वरुप रद्द करुन आपले एककेंद्री शासन हिटलरने प्रस्थापित केले आणि तो जर्मनीचा हुकूमशहा बनला.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा