!! शिवराय रन !!(२१ फेब्रुवारी )
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवराय रनचे आयोजन Cyruns Sports & Wellness यांनी केले होते. ही स्पर्धा दिनांक १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण करावयाची होती. मी २१ कि. मी.हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.
स्पर्धेसाठी मी वर्णे हायस्कूलपासून प्रारंभ केला होता. वर्णे-अपशिंगे (मि.)-
बोरगाव-नागठाणे पेट्रोल पंप आणि तेथून परत वर्णे असा स्पर्धेचा मार्ग होता.आज माझ्यासोबत धावण्यासाठी महेश माने हा विद्यार्थी होता.आज मी हे अंतर ०१:५५:३१(एक तास पंचावन्न मिनिटे आणि एकतीस सेकंदात )पूर्ण केले.
नेहमीप्रमाणे रुटसपोर्ट देण्याचे काम दादासाहेब सुतार यांनी केले. या रनच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे विचार देशातल्या सामान्य जनतेपर्यंत पोहचावेत अशी अपेक्षा आयोजकांची आहे.
चला तर शिवरायांना अपेक्षित असणारा समाज घडविण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
Well done sir 👍
उत्तर द्याहटवा