रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

गॅलिलिओ गॅलिली जन्मदिन १५६४!!(१५ फेब्रुवारी

 

!!गॅलिलिओ गॅलिली जन्मदिन १५६४!!(१५ फेब्रुवारी )



गॅलिलिओ गॅलिली जन्म: १५ फेब्रुवारी१५६४ मृत्यू: ८ जानेवारी१६४२ हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होता.
                       गॅलिलिओने पहिली चार वर्षे शिक्षण भिक्षूंच्या मठात घेतले. त्यानंतर ते फ्लॉरेन्स या शहरात गेले. त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरु केली. त्यांची इच्छा होती की गॅलिलिओने डॉक्टर बनावे. इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. त्यांची खरी ओढ गणिताकडे होती. तसेच विज्ञान प्रयोगाच्या आधारावर रहावे असे त्यांना वाटे. वैद्यकीय शिक्षणात त्यांना यश आले नाही.
                 एका कथेप्रमाणे १५८३ साली, गॅलेलिओ फक्त १७ वर्षाचा असताना, एका रविवारी धर्मगुरूच्या पिसामधल्या कॅथेड्रलमध्ये चालू असलेलेल्या कंटाळवाण्या प्रवचनादरम्यान गॅलिलिओने उंच झोके घेणारे एक झुंबर पाहिले आणि त्याला एकदम एक 'ब्रेनवेव्ह' आली. तो नाचत नाचतच घरी आला. त्याने लगेच प्रयोग सुरू केले. झोका लहान असो व मोठा किवा लंबकाचे वजन कमी असो व जास्त, त्याच्या एका आंदोलनाला सारखाच वेळ लागतो, हा निष्कर्ष त्याने काढला. 'दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो' हेही त्याला कळले. या सगळ्या प्रयोगांसाठी त्याकाळी घड्याळ नसल्याने वेळ मोजण्यासाठी त्यांने हाताची धडधड करणारी नाडीच वापरली होती. याच लंबकाचा वापर गॅलेलिओन त्याचे 'गतीचे नियम' मांडण्यासाठी केला. आणि असाच लंबक वापरून ह्युजेन्सने पहिले घड्याळ बनवले. त्या कॅथेड्रलमध्ये अजून एक दिवा आहे. तो 'गॅलिलियोचा दिवा' म्हणून ओळखला जातो.
                    त्या काळात अ‍ॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला.
       पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले. गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणिीमुळे लागले.
          १६०४ साली त्याला आकाशात एक नवीन उज्ज्वल तारा दिसला. १६०९ साली त्याने कुठल्याशा उपकरणाविषयी एक दंतकथेऐवजी अफवा ऐकली होती. कुणीतरी नळकांड्यात भिंग बसवून ते उपकरण बनवले होत. त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपणे दिसत. या दुर्बिणीविषयीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. गॅलेलिओला वाटले की, ‘याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रहतारे न्याहाळले तर?’ आणि गॅलेलियोने ती दुर्बीण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला. या दुर्बिणीतून त्याने चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले; १६१० साली गुरूचे निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे चंद्र शोधून काढले. शुक्रतारा आणि त्याच्या 'कला' यांचाही अभ्यास केला. या सगळ्या शोधांवर मग त्याने 'दी स्टोरी मेसेंजर' हे पुस्तकही लिहिले. गुरूभोवतीचे चंद्र बघून 'चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीत, त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही, आणि कोपर्निकसचे म्हणणे बरोबर असले पाहिजे’, असे त्याच ठाम मत झाले. या पुस्तकामुळे गॅलेलिओ चक्क रातोरात हीरो बनला. पण 'या दुर्बिणीतून दिसणाऱ्या चंद्रावरचे पर्वत, डाग आणि इतरही गोष्टी या खऱ्या नसून दिशाभूल करणाऱ्या आहेत, असेच चर्च म्हणायला लागले. व गॅलिलिलोविरुद्ध खटला चालू झाला. अ‍ॅरिस्टॉटलच्या सिद्धान्तांच्या विरुद्ध अशा अनेक गोष्टी गॅलिलिओ दुर्बिणीतून पाहू लागल्यामुळे तो काही तरी जादूटोणा करून लोकांना भुलवतो असा समज निर्माण झाला. त्याच्या शोधांमुळे अ‍ॅरिस्टॉटलच्या समर्थकांत खळबळ माजली. आपल्या सिद्धान्तांवर गॅलिलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशी समितीसमोर खेचले. सहा महिन्याच्या खटल्यानंतर २२ जून १६३३ रोजी जवळपास अंधत्व आलेल्या गॅलेलिओने पुन्हा हार मानली. एखाद्या अपराध्याप्रमाणे वागणूक देऊन त्याला कैदेत ठेवले गेले. या बंदिवासात असताना त्याने ‘टू न्यू सायन्सेस’ हे पुस्तक लिहिले आणि ते गुप्तपणे हॉलंडमध्ये प्रकाशित केले. वयाच्या ७८व्या वर्षी गॅलिलिओचे निधन झाले. अखेरची पाच वर्षे त्याला अंधत्व आले होते. विज्ञानाचे मेकॅनिक्स या विषयाचा गॅलिलिओ जनक समजला जातो.गॅलिलिओ गॅलिली यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
  संकलक: राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

1 टिप्पणी:

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...