!! श्रीनिवास पाटील चॅरिटेबल फौंडेशनच्या प्रगतशील महिला शेतकरी पुरस्काराने सौ. आशाताई पवार सन्मानित !!
म्हसवे ता. सातारा येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात वर्णे येथील सौ. आशाताई पवार यांना प्रगतशील महिला शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार फौंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील,उपाध्यक्षा सौ. रचनादेवी पाटील यांच्या शुभहस्ते तसेच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, किसनवीर कारखान्याचे संचालक नंदाभाऊ जाधव ,सचिन शेलार,भुजंगराव जाधव यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. शाल,श्रीफळ,प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या ८०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला शक्तीचा गौरव करण्याच्या दृष्टीने, कृषीलक्ष्मीना सन्मानित करण्यात आले. सौ. आशाताई पवार यांच्याबरोबर सातारा तालुक्यातील ७ महिलांना पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये नागठाणे येथील उषा साळुंखे,पाडळी येथील सौ. स्वाती ढाणे ,सौ. सुप्रिया ढाणे,कुशी येथील सौ. सारिका साळुंखे,शिवाजीनगर येथील सौ. उज्वला देशमुख, पवारांची निगडी येथील सिंधू पवार,म्हसवे येथील सौ. सुनीता शेलार यांचा समावेश होता.
या महिलांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग केले आहेत त्यामध्ये माती परीक्षण करुन, सेंद्रिय शेती करणे, भाजीपाला शेती, शेळीपालन, फुलशेती,बचतगट निर्मिती, रोपवाटिका,दुग्धव्यवसाय, प्रक्रिया उद्योग,आधुनिक सिंचन प्रणालीचा वापर,ट्रॅक्टर चालवणे अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली आहे.
यावेळी सारंग पाटील यांच्यासह सर्जेराव सावंत,सचिन शेलार, भुजंगराव जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन ,आभार प्रसाद पाटील यांनी मानले. यावेळी महिलांनी सचिन शेलार यांच्या शेतीस भेट दिली. आजच्या कार्यक्रमातून शेतीमध्ये महिलांचे योगदान किती अत्युच्य दर्जाचे आहे हे समजले. आपणही आपल्या गृहलक्ष्मीला सन्मानानं वागवायला हवं हा संदेशच मिळाला. या कार्यक्रमास वर्णे गावातील महिला ,पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा