!! भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून" मोर" या पक्षाला मान्यता १९६३ !!
( ३१ जानेवारी )
आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराची निवड केली गेली आहे. ही निवड करताना देशाच्या प्रत्येक भागात सापडणारा, नागरिकांना माहिती असलेला तसेच भारतीय संस्कृतीचा हिस्सा असलेला पक्षी निवडण्यास प्राधान्य होते व त्यात मोर यशस्वी झाला. भारताप्रमाणेच शेजारी म्यानमार देशाचा राष्ट्रीय पक्षी मोरच आहे.
मोराचा विणीचा हंगाम साधारण जानेवारी ते आक्टोबर असा असतो. लांडोर एकावेळी ३ ते ५ अंडी घालते. मोर केकारव करून लांडोरीना आकर्षिक करतात त्यासाठी पिसारा फुलवून नृत्यही करतात. मोर हे सुंदरता व सभ्यतेचे प्रतीक मानले जाते. त्याच्या पंखांचा वापर मुकुट, सिंहासने, शाईने मजकूर लिहिण्यासाठी असा अनेक प्रकारे होतोच पण हिंदू देवता श्रीकृष्णाच्या डोक्यावरही मोरपीस विराजमान आहे. गणेशाचा भाऊ कार्तिकेयाचे मोर हे वाहन आहे. मोर हा मुळचा भारतीयच आहे.
अलेक्झांडरने भारतातून मोर त्याच्या देशी नेले व त्यानंतर विविध देशात मोराच्या विविध प्रजाती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. मोर हा बहुभक्षी आहे म्हणजे तो साप, पाली किडे खातो तसेच धान्यही खातो. खुली मैदाने, दर्याखोर्यात ते राहतात. मोर उडतात कमी व रात्री झाडांवरच झोपतात. जंगलातील मोर सिंह अथवा अन्य प्राणी शिकारीसाठी बाहेर पडले तर जोरजोरात ओरडून अन्य प्राण्यांना सुचना देतात. मोराचा नाच हा नयनमनोहर सोहळा असतो. विशेषतः पावसाळ्यात या नाचाला बहर येतो. मोराच्या शिकारीवर भारतात बंदी आहे.
आजच्या दिवशी भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून "मोर" या पक्षाला १९६३ साली मान्यता दिली.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा