शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

!!नेताजी सुभाषचंद्र बोस जन्मदिन १८९७ !!(२३ जानेवारी )

 

!!नेताजी सुभाषचंद्र बोस जन्मदिन १८९७ !!(२३ जानेवारी )




      स्वातंत्र्य प्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अभूतपूर्व प्रयत्न केला. भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिश विरोधात युध्द करण्यास उभे राहिले .हे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते. त्यांचे नेते नेताजी सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे नेते होते. दोन वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष स्थान त्यांनी भूषवले. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतले असल्याचा फायदा घेऊन आंदोलन तीव्र करावे त्यासाठी इंग्रजांच्या शत्रुचीही मदत घ्यावी असे सुभासबाबूंचे मत होते. आपले विचार जनतेपर्यंत मांडण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष त्यांनी स्थापन केला.
          १९४३ मध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले. शहानवाझ खान,जगन्नाथ भोसले, डॉ. लक्ष्मी स्वामिनाथन, गुरुबक्षसिंग धीलला(Dhilla),प्रेमकुमार सेहगल त्यांचे प्रमुख सहकारी होते. कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन या झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय जनतेला "तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी डन
दूनगा(Dunga) "असे आवाहन केले.
     नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.नेताजींनी त्यांना "शहीद आणि स्वराज्य" अशी नावे दिली.१९४४ मध्ये आझाद हिंद सेनेने मॅनमारमधील आराकांनचा प्रदेश मिळविला. आसामच्या पूर्वसीमेवरील ठाणी जिंकली याचकाळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाली. याचकाळात जपानने शरणागती पत्करली.१८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. आणि आझाद हिंद सेनेच्या लढ्याचे रोमहर्षक पर्व संपले.
   संकलक: राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...