इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे स्मृतिदिन डिसेंबर ३१, १९२६
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (जुलै १२, १८६३ - डिसेंबर ३१, १९२६) हे मराठी इतिहास-संशोधक होते.
त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.
राजवाड्यांचे लेखन आणि प्रस्तावना
राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचं संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधनसामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता.
राजवाडे यांनी लिहिलेले साहित्य
- भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
- इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १ -मराठी भाषा व व्याकरण
- इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड २ -मराठी ग्रंथ व ग्रंथकार
- इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ३ -संस्कृत भाषा विषयक
- इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ४ -अभिलेख संशोधन
- इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ५ -मराठी धातुकोष
- इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ६ -व्युत्पत्ती कोष
- इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ७,८ -समाजकारण व राजकारण
- इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ९ - आत्मवृत्त व लेख
- इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १० -प्रस्तावना खंड
- इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ११ -इतिहास
- इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १२ -संपादक राजवाडे
- इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १३ -समग्र संत साहित्य
- खानदेशातील घराणी
- तीर्थरूप शहाजीराजे भोसलें यांचे चरित्र
- मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १ ते २२ (संपादन आणि प्रस्तावना)
- राजवाडेनामादिशब्द व्युत्पत्तिकोश
- राजवाडे लेखसंग्रह (संपादक - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी; साहित्य अकादमी प्रकाशन)
- राधामाधवविलासचंपू (संपादन आणि प्रस्तावना)
- संस्कृत प्रतिशब्दशः भाषांतर
- संस्कृत भाषेचा उलगडा
- ज्ञानेश्वर नीति कथा
- ज्ञानेश्वरी (राजवाडे संहिता) : अध्याय १ (२३ पानी प्रस्तावनेसह), ४, १२
- ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण
संकलन
राजेंद्र पवार
मोबा ९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा