!! जागतिक बँकेची स्थापना १९४५ !! (२७ डिसेंबर )
जागतिक बँक ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना २७ डिसेंबर १९४५ रोजी झाली.या बँकेच्या स्थापनेसाठी ब्रेटन वुडस् समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं स्वीकारण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देश व अविकसित देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बँकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.
गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.
जागतिक बँकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे --
१)सरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
२)अर्थव्यवस्थांचा विकास
३)भ्रष्टाचार निर्मूलन
४)गरीबी हटाव
५)संशोधन व शिक्षण
शिक्षणासाठी जागतिक बँक विषेश परिश्रम घेते.भारतासहित अनेक देशांना या बँकेने विविध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
Fruitful information you shares with us.thank you.
उत्तर द्याहटवा