वर्णे ता.जि. सातारा येथील रहिवासी
माजी सैनिक, वसंतराव नाईक फूलशेती
पुरस्कार विजेते, सातारा तालुका कुस्ती मल्ल विद्या अध्यक्ष योगेश पवार (आप्पा)
यांनी ऊस शेती क्षेत्रात किमया केली आहे. ऊस शेतीचा किमयागार म्हणून त्यांची तालुक्यात ओळख झालेली आहे.
योगेश पवार यांचे बंधू संतोष पवार हे ही सैन्यात होते त्यांचे शेतीमधील योगदान वाखाणण्यासारखे आहे. योगेश पवारांच्या विचाराला संतोष (दादा)पवार यांच्या कृतीची उत्तम साथ आहे. आता पुढील पिढीही शेतीमध्ये मदत करत आहे.
योगेश पवार यांचेकडे पारंपारिक ऊस शेती आहे. त्यांचे वडीलही आदर्श शेतकरी होते. इतरांच्यापेक्षा उत्पादन जास्त असले तरी त्याला शास्त्रीय ज्ञानाची जोड नसल्याने त्याला मर्यादा होत्या.
योगेश पवार यांचे वैशिष्ट्य म्हणजे लढाई करायची ती जिंकण्यासाठी. ते कारगिल योध्ये आहेत.ऑपरेशन विजयमध्ये त्यांचा सहभाग लक्षणीय होता. या युध्दात ते जखमी झाले. जखमी असतानाही शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली.
ऊस शेती करत असताना जमिनीची योग्य मशागत, बियाणे निवड, माती परीक्षण, खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, एकरी ऊसाची संख्या या बाबी महत्वाच्या आहेत.
गतवर्षी को-८६०३२ या जातीची पूर्व हंगामी लागवड केली होती. योगेश पवार यांनी ऊस पीक स्पर्धेतही भाग घेतला होता. त्यांच्या ऊस शेतीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना यांच्या अधिकाऱ्यांनी वारंवार भेटी दिल्या आहेत. या दोन्ही संस्थांच्यावतीने स्पर्धेत सहभाग घेतला असल्याने संबधित संस्थांच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले होते.
योगेश पवार यांनी यावर्षी एकरी १२६ टन सरासरी उत्पादन घेतले आहे. पुढील पीक हंगामात एकरी १५० टन ऊस उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते ऊस शेतीत प्रयोग करत आहेत. एकरी ५० टनापासून १२६ टनांपर्यंत मजल मारली आहे. पुढचा लक्षांक ते निश्चितच गाठतील यात शंका नाही.
ते ऊस पिकाबरोबर आले, पपई, गहू, ज्वारी इत्यादी उत्पादने घेतात. प्रत्येक पीक बघण्यासारखे असतेच. अशा या ऊस शेतीतील किमयागाराच्या शेतीला आपण अवश्य भेट द्यायला हवी.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
This is my personal Blog shares my story with social life , travel stories , spiritual moments and other programs .
शनिवार, १९ डिसेंबर, २०२०
!! ऊस क्षेत्रातील किमयागार योगेश पवार !! वर्णे ता.जि. सातारा येथील रहिवासी माजी सैनिक, वसंतराव नाईक फूलशेती पुरस्कार विजेते,सातारा तालुका कुस्ती मल्ल विद्या अध्यक्ष योगेश पवार (आप्पा) यांनी ऊस शेती क्षेत्रात किमया केली आहे. ऊस शेतीचा किमयागार म्हणून त्यांची तालुक्यात ओळख झालेली आहे. योगेश पवार यांचे बंधू संतोष पवार हे हेही सैन्यात होते त्यांचे शेतीमधील योगदान वाखाणण्यासारखे आहे. योगेश पवारांच्या विचाराला संतोष (दादा)पवार यांच्या कृतीची उत्तम साथ आहे. आता पुढील पिढीही शेतीमध्ये मदत करत आहे. योगेश पवार यांचेकडे पारंपरिक ऊस शेती आहे. त्यांचे वडीलही आदर्श शेतकरी होते. इतरांच्यापेक्षा उत्पादन जास्त असले तरी त्याला शास्त्रीय ज्ञानाची जोड नसल्याने त्याला मर्यादा होत्या. योगेश पवार यांचे वैशिष्ट्य म्हणजे लढाई करायची ती जिकण्यासाठी. ते कारगिल योध्ये आहेत.ऑपरेशन विजयमध्ये त्यांचा सहभाग लक्षणीय होता. या युध्दात ते जखमी झाले. जखमी असतानाही शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. ऊस शेती करत असताना जमिनीची योग्य मशागत, बियाणे निवड, माती परीक्षण, खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, एकरी ऊसाची संख्या या बाबी महत्वाच्या आहेत. गतवर्षी को-८६०३२ या जातीची पूर्व हंगामी लागवड केली होती. योगेश पवार यांनी ऊस पीक स्पर्धेतही भाग घेतला होता. त्यांच्या ऊस शेतीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना यांच्या अधिकाऱ्यांनी वारंवार भेटी दिल्या आहेत.या दोन्ही संस्थांच्यावतीने स्पर्धेत सहभाग घेतला असल्याने संबधित संस्थांच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले होते. योगेश पवार यांनी यावर्षी एकरी १२६ टन सरासरी उत्पादन घेतले आहे.पुढील पीक हंगामात एकरी १५० टन ऊस उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते ऊस शेतीत प्रयोग करत आहेत. एकरी ५० टनापासून १२६ टनांपर्यंत मजल मारली आहे. पुढचा लक्षांक ते निश्चितच गाठतील यात शंका नाही. ते ऊस पिकाबरोबर आले, पपई, गहू, ज्वारी इत्यादी उत्पादने घेतात. प्रत्येक पीक बघण्यासारखे असतेच.अशा या ऊस शेतीतील किमयागाराच्या शेतीला आपण आवश्य भेट द्यायला हवी. राजेंद्र पवार ९८५०७८११७८
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!
!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !! आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...

खूप छान. योगेश पवार हे आधुनिक शेतकरी आहेत. देशाची सेवा केल्या नंतर आता ते शेतीत नवे नवे प्रयोग करत आहेत. मला आठवते आहे त्यांनी असाच प्रयोग पॉली हाऊस मध्ये आले लावण्याचा केला होता. त्याच्या जिद्दीला सलाम
उत्तर द्याहटवा