! INDIA’S HERITAGE VIRTUAL HALF MARATHON !!
जागतिक वारसास्थळ म्हणून नोंदणी झालेल्या आपल्या देशातील स्थळांची माहिती व्हावी या उद्देशाने "माईलस्टोन फिटनेस क्लब "ने हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले होते. या मरेथॉनमध्ये २ कि.मी, ५ कि. मी, १०कि. मी.आणि २१ कि. मी.मध्ये भाग घेता येत होता.
मी वयाच्या ६२ व्या वर्षी २१ कि. मी.मध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेचा प्रारंभ १८ऑक्टोबर पासून झालेला होता. प्रत्येक रविवारी स्पर्धा असायची, शेवटचा दिवस २९ नोव्हेंबर असा होता. यावेळी मी प्रत्येक स्पर्धा दोन तासांच्या आत पूर्ण केली, इतकेच नव्हे तर प्रत्येक वेळी टॉप टेन मध्ये माझा नंबर आलेला आहे.
१) सुंदरबन (प.बंगाल) १८ ऑक्टोबर ०१:५८:२५
२) व्हॅली ऑफ फ्लॉवर्स (उत्तराखंड ) २५ ऑक्टोबर ०१:५९:०८
३) ताजमहाल (आग्रा) ०१ नोव्हेंबर ०१:५४:०५
४) खजुराहो (मध्यप्रदेश ) ०८ नोव्हेंबर ०१:५५:४२
५) कुंभारगड (राजस्थान) १५ नोव्हेंबर ०१:५५:०९
६) हंपी (कर्नाटक ) २२ नोव्हेंबर ०१:५७:२१
७) काझीरंगा (आसाम ) २९ नोव्हेंबर ०१:५२:५५
शेवटच्या दिवसाचे सर्टिफिकेट आणि लीडरबोर्ड २ दिवसांनी येईल.
या स्पर्धेत आमच्या कुटुंबातील अन्य ४ सदस्य सहभागी झाले होते. मुलगा डॉ.श्रीधर १० कि. मी;सून सौ. शीतल ५ कि. मी;पुतणी कु.अंजली ५ कि. मी;पत्नी सौ. कुसुम २ कि. मी.मध्ये भाग घेतला होता. मी स्पर्धेसाठी वर्णे (हायस्कूल)-अपशिंगे (मि.)- बोरगाव-नागठाणे-नागठाणे पेट्रोल पंप परत वर्णे असा मार्ग निवडला होता.फक्त एकदाच सातारा एम.आय.डी.सी. मध्ये धावलो होतो.प्रत्येक वेळी रुट सपोर्ट देण्याचे काम दादासाहेब सुतार यांनी केले होते.स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महेश माने व चेतन साळुंखे हे दोघेही माझेबरोबर धावले. या दोघांच्यामुळे हाफ मरेथॉनचे अंतर मी विक्रमी वेळात पूर्ण केले.
मी सेवानिवृत्तीनंतर स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली आणि आपणा सर्वांच्या सदिच्छामुळे यशस्वी झालो. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायामाची गरज आहे. आतातर कोरोनाचा काळ आहे त्याला सामोरे जाण्यासाठी आपली प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे. चला तर आपण सर्वजणच नियमित व्यायाम करुया, कोरोनाला हरवूया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
Congratulations! Well done and keep it up!
उत्तर द्याहटवाVery Nice Sir
उत्तर द्याहटवाअभिनंदन दादा 💐 तुम्ही आमच्या साठी नेहमीच प्रेरणास्थान राहिले आहात. Keep it up 👍
उत्तर द्याहटवाCongratulation sir.
उत्तर द्याहटवाPain is temporary but
Prize is forever.