!! भाऊबीज (यमद्वितीया ) !!
(१६ भाऊबीज )
कार्तिक शुद्ध द्वितीया यादिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यमद्वितीया असेही म्हणतात. त्यामागील कारण म्हणजे या दिवशी यम आपल्या बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो. हेच कारण आहे की या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
असे म्हणतात की या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्त्व जागृत होतं. अशा परिस्थितीत बहिणीच्या सानिध्यात राहण्याने तिच्या हाताने बनलेले पदार्थ खाल्ल्याने आणि तिच्याकडून ओवाळून घेतल्याने भावाला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतो.
सण साजरा करण्याची पद्धत
या दिवशी भावाला तेल-उटणे लावून अंघोळ घालावी.
बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावेत, भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसल्यास तिने चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी. अपमृत्यू निवारणार्थ या दिवशी यमाला दीप दान करावे.आपणास भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
Nice Massage sir.
उत्तर द्याहटवाभाउबिजेच्या हार्दिक सुभेछा
उत्तर द्याहटवा