रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

 

!!ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा स्मृतिदिन !!
  (१० नोव्हेंबर )



        माणिक वर्मा जन्म:१६ मे १९२६ मृत्यू:१०नोव्हेंबर१९९६
माणिक वर्मा, पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर या हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीतप्रकारांत गायन करणाऱ्या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत. 
           मराठी भाषेतील गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. किराणा घराण्याच्या गायिका  हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी  संगीत शिकल्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल  १९७४ साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.
    माणिक वर्मा यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
(माणिक वर्मा यांनी गायलेले"अमृताहूनी गोड नाम तुझे देवा"हे गीत ऐकण्यासाठी लिंक देत आहे. आपण या गीताचा आस्वाद घ्यावा.)
https://youtu.be/5MW577qqtgI
           संकलक:  राजेंद्र पवार
                     ९८५०७८११७८

२ टिप्पण्या:

  1. अतिशय मधुर गोड आवाजात ह्रदयस्पर्शी अशी भावगीतं आणि चित्रपट गीते गायलेल्या सोज्वळ गायिका. उदाहरणार्थ एक भावगीत
    "निघाले आज तिकडच्या घरी " सासरी निघालेल्या मुलीची मनस्तिती घालमेल या गाण्यातुन जाणवते ऐकूण मन हेलावते.
    एम एस चव्हाण एकंबे(सातारा)

    उत्तर द्याहटवा
  2. 10 Nov 2020
    जेष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या स्मृतिदिनानिमित्त
    विनम्र आभिवादन M S Chavan

    उत्तर द्याहटवा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...