!! कविवर्य भा. रा. तांबे जन्मदिन !!
(२७ ऑक्टोबर )
भास्कर रामचंद्र तांबे जन्म:२७ऑक्टोबर १८७३ मृत्यू: ७ डिसेंबर १९४१ अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी होत. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
तांबे यांनी बालगीते,नाट्य गीतेही लिहिली आहेत.त्यांच्या बहुतांश कविता प्रेमसंबंधीच्या असून त्यामध्ये निसर्गावरील प्रेमही व्यक्त केलेले दिसून येते. त्यांच्या कवितांतून महिलांविषयी विशेषतः बालविधवाबद्दल अधिक सहानुभूती दिसून येते. त्याकाळी बाल-जरठ विवाह होत असत त्यामुळे अनेक मुलींना लवकरच विधवा व्हावे लागे आणि आपल्या जोडीदाराशिवाय संपूर्ण जीवन व्यथित करावे लागे,त्याचे वर्णनही कवितातून दिसून येते.
तांबे यांच्या काही प्रसिद्ध कविता
१)अजुनि लागलेचि दार
२)कशी काळ नागिणी
३)कळा ज्या लागल्या जीवा
४)कुणि कोडे माझे उकलिल का
५)घट तिचा रिकामा
६)घन तमीं शुक्र बघ
७)चरणि तुझिया मज देई
८)जन पळभर म्हणतील हाय हाय
९)डोळे हे जुलमि गडे
१०)तिनी सांजा सखे मिळाल्या
११)तुझ्या गळा माझ्या गळा
१२)नववधू प्रिया मी बावरतें
१३)निजल्या तान्ह्यावरी माउली
१४)पिवळे तांबुस ऊन कोवळे
१५)भाग्य उजळले तुझे
१६)मधु मागशी माझ्या
१७)मावळत्या दिनकरा
१८)या बाळांनो या रे या
भा. रा.तांबे यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
भा. रा.तांबे यांची कविता ऐकण्यासाठी यु ट्यूबची लिंक देत आहे. आपण कवितेचा आस्वाद घ्या.
https://youtu.be/Qvsg5htk9_c
संकलक :राजेंद्र पवार
९८५०७८११७८
Parth Ankush Desai
उत्तर द्याहटवाVery Nice sir
उत्तर द्याहटवाNice...
उत्तर द्याहटवा