!! श्रीरामाची माहिती !!
आज अयोध्या येथे श्रीराम मंदिर भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होत आहे त्या निमित्ताने प्रभू श्रीरामाविषयी थोडेसे--
राम किंवा श्रीराम हे वाल्मीकिंंनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते, अशी मान्यता आहे. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला असे मानले जाते. प्रभु श्री राम सत्य वचनी व एक पत्नी व्रत व परम दयाळू होते.
नावाविषयी थोडेसे --
राम : राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसर्याना आनंदात रममाण करणारा.
श्रीराम : दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वतःचे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला ‘श्रीराम’ म्हणू लागले.
श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर त्याने आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला. श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’
श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखांंवरून दिसून येते. म्हणूनच त्यांना भारतीय जनमानसात ‘मर्यादापुरुषोत्तम’ असे म्हटले जाते.
संग्राहक-- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

श्रीराम जय राम जय जय राम 🙏
उत्तर द्याहटवा